शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निर्यात कोट्यामुळे कच्च्या साखरेचे करायचे काय?, कोटा वाढवण्याची साखर महासंघाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 17:58 IST

५३ टक्के कच्ची साखर निर्यात परवान्याविना देशातच पडून राहणार

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : साखरेची निर्यात मर्यादा १०० लाख टन केल्यामुळे देशात कच्ची साखर मोठ्या प्रमाणात शिल्लक राहून साखर उद्योगाचे विशेषतः सहकारी कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.सणासुदीच्या काळात देशात साखरेची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून चालू हंगामात १०० लाख टनच साखर निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यासाठी एक जूनपासून साखर निर्यात परवाना (एक्स्पोर्ट रीलिज ऑर्डर) घेणे कारखाने आणि निर्यातदारांना सक्तीचे केले आहे. यानुसार पहिल्या आठवड्यातच केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने कच्ची साखर निर्यातीच्या दिलेल्या परवान्यांमधील केवळ ४७ टक्के परवाने सहकारी साखर कारखान्यांना दिले आहेत. यामुळे ५३ टक्के कच्ची साखर निर्यात परवान्याविना देशातच पडून राहणार आहे. परवाने मंजुरीत पक्षपाताचा आरोप राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने केला आहे.देशात २५८ सहकारी साखर कारखाने आहेत. गेल्या तीन हंगामात २२२ लाख टन साखरेची निर्यात केली आहे. या निर्यातीतून ६० हजार ८०० कोटींचा महसूल मिळाला आहे. आर्थिक अडचणीतून साखर उद्योग बाहेर पडण्यास यामुळे मदत झाली. निर्यात साखरेतील ४१ टक्के वाटा सहकारी साखर कारखान्यांचा आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकातील कारखान्यांची यामध्ये आघाडी आहे.

साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी म्हणून लाखो टन कच्ची साखर तयार करून ठेवली आहे. या साखरेला देशात मागणी नाही. शिवाय ती जास्त दिवस साठवूनही ठेवता येत नाही. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना पुरेसे निर्यात परवाने द्यावेत, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केली आहे.

शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्रमाजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतंत्र पत्र लिहून, साखर कारखानदारीसमोरील या संकटाकडे लक्ष वेधले आहे आणि निर्यात कोटा १०० लाख टनापेक्षा वाढवून द्यावा, अशी मागणी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी