तुम्ही कसले सहआरोपी, तुम्ही तर मुख्य आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:24 IST2021-05-17T04:24:12+5:302021-05-17T04:24:12+5:30
कोल्हापूर : जनतेने नाकारलेले दक्षिणचे माजी आमदार अंमल महाडिक यांनी, जिल्ह्याचे कार्यक्षम मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर फेसबुकद्वारे बिनबुडाचे आरोप ...

तुम्ही कसले सहआरोपी, तुम्ही तर मुख्य आरोपी
कोल्हापूर : जनतेने नाकारलेले दक्षिणचे माजी आमदार अंमल महाडिक यांनी, जिल्ह्याचे कार्यक्षम मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर फेसबुकद्वारे बिनबुडाचे आरोप केले असून, मंत्री मुश्रीफ यांनी स्वतःवर गुन्हा नोंद करण्याची तयारी दाखवली तर मीही सहआरोपी व्हायला तयार आहे असे बालिश व्यक्तव्य केले आहे. वास्तविक त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते राज्यातील अपरिपक्व नेतृत्व आणि स्वतः तेच कोरोनाचे प्रचारक आहेत. त्यामुळे त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची वेळ आली आहे आणि हेच प्रमुख आरोपी आहेत, असे पत्रक राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर दक्षिणचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
कोरोना संकटाची कोल्हापूरला कमीत कमी झळ बसावी यासाठी मंत्री मुश्रीफ साहेब दररोज १७ ते १८ तास काम करत आहेत. म्हणून त्यांनी श्रावणबाळ, महाडॉक्टर म्हणून नाव लौकिक मिळवला आहे. तर घरातील आलिशान बिळात बसून वडिलांच्या पुण्याईवर राजकारण करणाऱ्यांनी सूर्यावर थुंकण्याचे काम करू नये. मंत्री मुश्रीफ यांची कोल्हापूरसह महाराष्ट्र कोरोना मुक्तीसाठीची धडपड ही घराबाहेर न पडणाऱ्या माजी आमदारांना हे दिसणे अशक्य आहे.