शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....

By संतोष कनमुसे | Updated: August 6, 2025 19:23 IST

Kolhapur Mahadevi Elephant : महादेवी हत्ती लवकरच कोल्हापुरला परत येणार आहे, याबाबत आज वनताराच्या सीईओ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Kolhapur Mahadevi Elephant : मागील काही दिवसांपासून महादेवी हत्ती परत मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज वनताराचे सीईओ विवान करानी यांनी नांदणी येथील मठाचे महास्वामी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. माधुरी हत्ती परत आणण्यासाठी नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकार मिळून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

"आम्ही सगळी म्हणजे नांदणीचा मठ, वनतारा आणि राज्य सरकार सर्वजण मिळून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. आम्ही हत्तीची या ठिकाणी चांगली व्यवस्था करणार आहे. हत्तीणीचे आम्ही लवकरच पुनर्वसन करणार आहे. आम्ही सर्वजण मिळून या गोष्टी सकारात्मक करणार आहे. अनंत अंबांनी यांगी सांगितले आहे की, आम्हाला कधीच कोल्हापूर वासियांना दु:ख द्यायचे नव्हते. त्यांना माधुरीची काळजी वनतारामध्ये घ्यायची होती. यामध्ये इगो अडवा येत नाही, यामध्ये कोणाची हार किंवा विजय नाही. यामध्ये हत्तीचा विजयच आहे. कारण हत्तीला वनतारामध्येही चांगले घर मिळत होते आणि मठामध्येही चांगले घर मिळत होते. तुमची माधुरी लवकरच कोल्हापुरात येईल,  अशी माहितील वनताराचे सीईओ विवान करानी यांनी दिली.

कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार

आम्ही या याचिकेमध्ये वनतारामध्ये हत्तीसाठी जी व्यवस्था आहे तीच व्यवस्था या मठामध्ये करणार असल्याची माहिती देणार आहे. आम्ही ही याचिका पेटा आणि एचपीसी यांच्या पाठिंब्याने ही याचिका दाखल करणार आहे. आम्ही कधीही कोल्हापुरवासियांना दुखावण्याचा प्रयत्न केला नाही, सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आला त्यावर आम्ही काम करत होतो.सगळ्यांनी समजून घेतल्याबद्दल आभारी आहे, असंही वनताराचे सीईओ विवान करानी म्हणाले. 

"वनताराचे सीईओ विवान करानी यांच्यासोबत बैठक झाली. नांदणी मठ, वनतारा, महाराष्ट्र सरकार यांच्यामार्फत याचिका दाखल केली जाणार आहे. मठाजवळ केंद्र उभा करण्यात येणार आहे. हत्तीची मालकी हक्क मठाकडे राहणार आहे. हत्तीच्या देखभाल, वैद्यकीय व्यवस्था वनतारा पुरवणार आहे. त्याचबरोबर समाधानकारक चर्चा झाली आहे.माधुरी हत्ती परत येईपर्यंत वनताराने आम्हाला मदत करावी अशी आमची विनंती आहे. अनंत अबांनी यांच्या परिवाराने वनताराच्या पथकाला इथे पाठवले आहे. अंबांनी यांच्या या भूमिकेला आमचा आशीर्वाद आहे, असंही महास्वामी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVantaraवनतारा