शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

हरित फटाके म्हणजे काय रे भाऊ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 12:01 IST

environment , Diwali, crackersban, Sangli, राष्ट्रीय हरित लवादाने कमी आवाज व कमी प्रदूषण करणाऱ्या हरित फटाक्यांना मंजुरी दिली आहे. मात्र बाजारात हरित फटाके म्हणजे काय, हेच कुणाला माहीत नाही. खुद्द विक्रेत्यांना नेमके कोणते फटाके हरित आहेत, याची कल्पना नाही. त्यामुळे विक्रेते आणि ग्राहक दोघेही संभ्रमात आहेत.

ठळक मुद्देहरित फटाके म्हणजे काय रे भाऊ! विक्रेते, ग्राहकांत संभ्रम : नेमकी माहिती उपलब्ध नाही

शीतल पाटीलसांगली : राष्ट्रीय हरित लवादाने कमी आवाज व कमी प्रदूषण करणाऱ्या हरित फटाक्यांना मंजुरी दिली आहे. मात्र बाजारात हरित फटाके म्हणजे काय, हेच कुणाला माहीत नाही. खुद्द विक्रेत्यांना नेमके कोणते फटाके हरित आहेत, याची कल्पना नाही. त्यामुळे विक्रेते आणि ग्राहक दोघेही संभ्रमात आहेत.फटाके म्हटले की आवाज आणि धूर होणारच; पण यंदा राष्ट्रीय हरित लवादाने हवा प्रदूषणाबाबत सक्त भूमिका घेतली. देशातील १२२ शहरांत फटाक्यांना बंदी घातली. त्यात सांगलीचाही समावेश आहे. अतिप्रदूषित शहर म्हणून सांगलीचा उल्लेख झाला. लवादाच्या निर्णयानंतर नागरिकांत हरित फटाक्यांबाबत उत्सुकता दिसून आली. त्यात महापालिकेने सरसकट फटाके विक्रेत्यांच्या स्टॉलला परवानगी दिली. शहरात हवा प्रदूषणाची पातळी समाधानकारक असल्याचा दावाही करण्यात आला.पण नेमके हरित फटाके म्हणजे काय? याची माहिती विक्रेत्यांनाही नसल्याची बाब समोर आली. काही नागरिकांनी शहरातील स्टॉलवर हरित फटाक्यांची मागणीही केली, पण फुलझाडे, भुईचक्कर, लहान आवाजाचे फटाके हेच हरित फटाके असल्याचे सांगण्यात आले. बाजारात हरित फटाक्यांच्या व्याख्येबाबत अस्पष्टता दिसून येत होती. दिवाळीच्या आधी दोन महिने फटाक्यांचे बुकिंग केले जाते. त्यामुळे आता निर्णय आल्यानंतर खरेदी केलेला माल कोठे विकायचा, असा प्रश्नही विक्रेते संजय चव्हाण यांनी उपस्थित केला.हरित फटाके आणायचे कोठून?फटाक्यांच्या अनेक खोक्यांवर त्या फटाक्यामध्ये असलेल्या घटकांची माहिती दिलेली नाही. काही फटाक्यांवर ग्रीन क्रॅकर्स असे लिहिले आहे. तेच हरित फटाके असल्याचे सांगून विक्री सुरू आहे. वर्षानुवर्षे तेच फटाके विकल्यानंतर एकाएकी हरित फटाके कोठून आणायचे? दिवाळीच्या चार दिवसांत फटाक्याचे प्रदूषण होते; मग वर्षभर वाहनांच्या धुरामुळे जे प्रदूषण होते, त्याचा विचार का केला जात नाही, असा सवालही विक्रेते करतात. 

टॅग्स :Crackers Banफटाके बंदीSangliसांगलीenvironmentपर्यावरणDiwaliदिवाळी