शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

राजू शेट्टींनी ५०० एकर शेती घेतली त्याचे काय?, राजेश क्षीरसागर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 18:07 IST

मी आधीही शेतकरी नव्हतो आणि आताही नाही. परंतु..

कोल्हापूर : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेसेनेला पोषक वातावरण असून, अनेक जण पक्ष प्रवेशास इच्छुक आहेत. यात एक मोठा बॉम्ब लवकरच फुटणार आहे, असे संकेत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी दिले. शिंदे सेनेत लवकरच हे पक्ष प्रवेश होतील, असेही त्यांनी सांगितले.राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी सोमवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. क्षीरसागर यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी हर्षल सुर्वे, माजी नगरसेवक रमेश पुरेकर उपस्थित होते.शिंदेसेनेत काही दिवसांपूर्वी २२ माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश केले होते. पक्ष प्रवेश संपले का? असे विचारले असता क्षीरसागर यांनी सांगितले की, शिंदे सेनेत येण्यास निवडून येण्याची क्षमता असलेले अनेक जण इच्छुक आहेत. त्याची नावे लवकरच समजतील. त्यात काही मोठे बॉम्ब फुटणार आहेत.शक्तिपीठ महामार्ग आंदोलनावरून राजेश क्षीरसागर शेतकरी आहेत का, त्यांची शेती आहे का? असे प्रश्न आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित केले जात आहेत, याकडे लक्ष वेधले असता, क्षीरसागर यांनी सांगितले की, मी आधीही शेतकरी नव्हतो आणि आताही नाही. परंतु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे २०४७ सालचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असे प्रकल्प होणे अत्यावश्यक आहे. म्हणून मी यासाठी आग्रही आहे. परंतु, माझ्यावर उठसूठ आरोप करणारे राजू शेट्टी यांनी ५०० एकर शेती घेतली त्याचे काय? असाही सवाल त्यांनी केला.