संजयसिंह चव्हाण यांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST2021-01-22T04:22:42+5:302021-01-22T04:22:42+5:30
कोल्हापूर : नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेत गुरुवारी सकाळी स्वागत करण्यात आले. मावळते मुख्य ...

संजयसिंह चव्हाण यांचे स्वागत
कोल्हापूर : नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेत गुरुवारी सकाळी स्वागत करण्यात आले. मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मात्र चव्हाण हे उद्या, शनिवारी दुपारी अधिकृत कार्यभार स्वीकारणार आहेत.
मित्तल यांची लातूर महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. मात्र जिल्हा परिषदेचा उद्या, शनिवारी कार्यक्रम असल्याने ते थांबले आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळी चव्हाण जिल्हा परिषदेत आले. तेव्हा त्यांचे स्वागत करण्यात आले. दुपारनंतर चव्हाण यांनी अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
२१०१२०२१ कोल संजयसिंह चव्हाण
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे गुरुवारी अमन मित्तल यांनी स्वागत केले.