कुंभोजात पद्मावती देवीच्या सुवर्ण मूर्तीचे रथातील मिरवणुकीने स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:26 IST2021-02-11T04:26:40+5:302021-02-11T04:26:40+5:30
शीतल पाटील(उगार), तसेच आदित्य अरुण पाटील (कुंभोज) यांनी रथातून पद्मावती देवीच्या मूर्तीचे स्वागत केले. मानाच्या असणाऱ्या पाटील घराण्याच्या ...

कुंभोजात पद्मावती देवीच्या सुवर्ण मूर्तीचे रथातील मिरवणुकीने स्वागत
शीतल पाटील(उगार), तसेच आदित्य अरुण पाटील (कुंभोज) यांनी रथातून पद्मावती देवीच्या मूर्तीचे स्वागत केले. मानाच्या असणाऱ्या पाटील घराण्याच्या वतीने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे बुधवारी पद्मावती देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. पार्श्र्वनाथ दिगंबर जैन मंदिर, आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, महावीर जैन मंदिर या ठिकाणी समस्त जैन समाजाच्या वतीने पद्मावती देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. तसेच विवेक पाटील, अशोक पाटील, संजय पाटील, बबन पाटील, आण्णासाहेब पाटील यांच्या घरी पद्मावती देवीची ओटी भरणेत आली.
बाबासाहेब पाटील, माजी जि. प अध्यक्ष डी. सी पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील, आर. पी. पाटील, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, जवाहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, शरद साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले, अभिनंदन पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील, आदींनी कार्यक्रम स्थळी उपस्थिती दर्शविली. शांतीसागर झांजपथक, वीर सेवादल, वीर महिला मंडळाने कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले
फोटो ओळी-
कुंभोज (ता. हातकणंगले) येथे पद्मावती देवीच्या सुवर्ण मूर्तीची गावातील प्रमुख मार्गावरून रथातून मिरवणुकीत काढण्यात आली.
दुसऱ्या छायाचित्रात सहभागी शेकडो श्रावक व श्राविका.