नववर्षाचे स्वागत साधेपणाने करा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:24 IST2020-12-31T04:24:54+5:302020-12-31T04:24:54+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गुरुवार, ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप व नूतन वर्षाचे स्वागत शासनाने घालून दिलेल्या ...

Welcome the New Year simply. Appeal of District Collector Daulat Desai | नववर्षाचे स्वागत साधेपणाने करा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आवाहन

नववर्षाचे स्वागत साधेपणाने करा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आवाहन

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गुरुवार, ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप व नूतन वर्षाचे स्वागत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत साधेपणाने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी केले.

नागरिकांनी तलाव, उद्याने, नदीघाट अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता, सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल, याकडे लक्ष द्यावे. विशेषत: रंकाळा तलाव, कळंबा तलाव, नदी घाट परिसर, उद्याने याठिकाणी आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच ६० वर्षांवरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी घराबाहेर जाणे टाळावे. नववर्ष स्वागताच्या निमित्ताने कोणतेही धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नयेत तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. फटाक्यांची आतषबाजीही करु नये. तसेच प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

--

Web Title: Welcome the New Year simply. Appeal of District Collector Daulat Desai