वादळ वाऱ्याच्या तडाख्याने चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्वागत कमान कोसळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST2021-05-19T04:24:25+5:302021-05-19T04:24:25+5:30
शित्तूर-वारूण: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्वागत कमान वादळ वाऱ्याच्या तडाख्यात कोसळली आहे. लाखो रुपये खर्च करून ...

वादळ वाऱ्याच्या तडाख्याने चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्वागत कमान कोसळली!
शित्तूर-वारूण:
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्वागत कमान वादळ वाऱ्याच्या तडाख्यात कोसळली आहे. लाखो रुपये खर्च करून पर्यटकांच्या स्वागतासाठी जाधववाडी चेक पोस्टजवळ ही आकर्षक स्वागत कमान उभी करण्यात आली होती. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या या स्वागत कमानीवर चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळणारे प्राणी, पक्षी यांच्यादेखील प्रतिकृती लावण्यात आल्या होत्या.
रविवारी आणि सोमवारी वादळ वाऱ्यासह पावसाने या परिसरात कहर केला. याचा फटका चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या भव्य आणि आकर्षक असणाऱ्या स्वागत कमानीस बसला आहे. जोराच्या वाऱ्यामुळे ही स्वागत कमान पूर्णपणे कोसळली असून, आजूबाजूला लावलेल्या प्राण्यांच्या प्रतिकृतीदेखील मोडल्या आहेत. यामुळे सुमारे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
फोटो :
वादळ वाऱ्याच्या तडाख्याने चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्वागत कमान अशी जमीनदोस्त झाली आहे. (छाया : सतीश नांगरे)