शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारसाठी कोल्हापुरातून दर रविवारी साप्ताहिक रेल्वे, उन्हाळी सुटीसाठी खास सोय; कधीपासून सुरु.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:50 IST

कोल्हापूर : उन्हाळी सुटीत उत्तर भारतात जाण्यासाठी बिहारीबाबूंच्या सोयीसाठी मध्ये रेल्वेने कोल्हापूर -कटीहार विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू केली आहे. ...

कोल्हापूर : उन्हाळी सुटीत उत्तर भारतात जाण्यासाठी बिहारीबाबूंच्या सोयीसाठी मध्ये रेल्वेनेकोल्हापूर-कटीहार विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू केली आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना बिहारमध्ये जाण्यायेण्यासाठी कोल्हापूर ते कटीहार क्रमांक ०१४०५/०१४०६ ही साप्ताहिक विशेष रेल्वे दि. ६ एप्रिलपासून दर रविवारी सुरू होत आहे. या विशेष रेल्वेचा फायदा प्रवाशांनी घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरून ६ एप्रिलपासून २७ एप्रिलपर्यंत ही उन्हाळी सुटीच्या कालावधीपुरती एक्स्प्रेस धावणार आहे. बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना ही गाडी सोयीची ठरणार आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून ही विशेष साप्ताहिक रेल्वेसाठी सांगलीचाही थांबा आहे. यामुळे बिहारला जाणाऱ्या किंवा तिकडून येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बिहारी नागरिक विविध कामासाठी मोठ्या संख्येने पश्चिम महाराष्ट्रात वास्तव्य करीत आहेत. त्यांच्यासाठी बिहारच्या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे गाडीची मागणी गेल्या पन्नास वर्षांपासून होत आहे. या मागणीला प्रतिसाद देत अखेर मध्य रेल्वेने कोल्हापुरातून बिहारला जाणारी ही विशेष रेल्वे गाडी आता सुरू केली आहे. सध्या ही गाडी उन्हाळी विशेष साप्ताहिक रेल्वे म्हणून धावणार असून, या गाडीला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून नंतर ही गाडी कायम होण्याची शक्यता आहे.प्रत्येक रविवारी सुटणारकोल्हापूर रेल्वे स्थानकावरून ६ एप्रिलपासून गाडी क्र. ०१४०५ ही एक्स्प्रेस प्रत्येक रविवारी सकाळी ९:३५ वाजता बिहारमधील कटिहारकडे रवाना होणार आहे. कोल्हापुरातून ही गाडी तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी कटिहारला पोहोचेल.

असा असेल परतीचा प्रवासकटिहार-सांगली-कोल्हापूर एक्स्प्रेस गाडी क्र. ०१४०६ ही गाडी ८ एप्रिलपासून २९ एप्रिलपर्यंत दर मंगळवारी परतीच्या प्रवास सुरू करेल. मंगळवारी सायंकाळी ६:१० वाजता कटिहार स्थानकावरून निघून ही गाडी गुरुवारी तिसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल.असे असतील थांबेमिरज, सांगली, कऱ्हाड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड केबिन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र (पटना), हाजीपूर, बरौनी, बेगुसराय, खगडिया आणि नौगचिया इथे थांबून मंगळवारी सकाळी ६:१० वाजता कटिहारला पोहोचेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBiharबिहारrailwayरेल्वेpassengerप्रवासी