कोल्हापूर : शहरातील मंगल कार्यालय, खुले लॉन, हॉल, सभागृह, हॉटेल, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग तसेच कोविड-१९ संदर्भात केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्नसमारंभ पार पाडण्यास महानगरपालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त निखिल मोरे यांनी बुधवारी पुन्हा दिला.शासनाने वेळोवेळी आदेश देऊनही त्याचे उल्लंघन करून गर्दीचे कार्यक्रम आयोजित होत असल्याचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या निदर्शनास आले आहे. म्हणूनच महानगरपालिकेने दिलेल्या परवानगीमधील अटींचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी; अन्यथा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
लग्नसोहळा ५० लोकांच्या उपस्थितीतच, उल्लंघन झाल्यास कारवाई : उपायुक्त मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 15:42 IST
Coronavirus Unlock, kolhapur, collector कोल्हापूर शहरातील मंगल कार्यालय, खुले लॉन, हॉल, सभागृह, हॉटेल, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग तसेच कोविड-१९ संदर्भात केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्नसमारंभ पार पाडण्यास महानगरपालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे.
लग्नसोहळा ५० लोकांच्या उपस्थितीतच, उल्लंघन झाल्यास कारवाई : उपायुक्त मोरे
ठळक मुद्देलग्नसोहळा ५० लोकांच्या उपस्थितीतचउल्लंघन झाल्यास कारवाई : उपायुक्त मोरे