जमीन व्यवहारातील फसवणूक टाळण्यासाठी वेबसाईट

By Admin | Updated: September 5, 2015 00:16 IST2015-09-05T00:16:48+5:302015-09-05T00:16:48+5:30

सतीश जोशी यांचा पुढाकार : मालमत्ता खरेदी करताना खबरदारीसाठी मार्गदर्शक

Websites to avoid fraudulent transactions | जमीन व्यवहारातील फसवणूक टाळण्यासाठी वेबसाईट

जमीन व्यवहारातील फसवणूक टाळण्यासाठी वेबसाईट

कोल्हापूर : जमीन खरेदी-विक्रीवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी पुणे येथील सतीश मुकुंद जोशी यांनी ६६६.स्र१ङ्मस्री१३८’ं६’ीं१ल्ल्रल्लॅ.ूङ्मे ही मराठीतील वेबसाईट स्वत:चे पैसे खर्च करून तयार केली आहे. आतापर्यंत या वेबसाईटला दोन हजारांवर लोकांनी भेट दिली आहे. पुणे येथील सिंहगड रस्त्यावरील अमृतसिद्धी अपार्टमेंटमध्ये जोशी राहतात. ते अखिल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. त्यांनी जमीनविषयक कायदे, मार्गदर्शन या विषयांवर पुस्तक लेखन केले आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून जमिनीसंबंधीच्या चळवळींचा अनुभव असल्यामुळे त्यांनी मालमत्ता खरेदी-विक्री करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरणारी वेबसाईट सुरू केली. या वेबसाईटसाठी त्यांनी दीड लाख रुपये खर्च केले असून, ही त्यांची दुसरी वेबसाईट आहे.
सध्या सर्वत्र मालमत्तेच्या खरेदी-विक्री वाढली आहे. परिणामी, या व्यवहारात फसवणुकीचे प्रकार होत आहेत. त्यामुळे जोशी यांनी ही वेबसाईट सुरू केली आहे.
व्यवहारावेळी करावयाच्या कराराचे १०४ प्रकारचे इंग्रजी भाषेतील नमुने या वेबसाईटवर डाऊनलोड केले आहेत. याशिवाय मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी कोणती कागदपत्रे पाहणे आवश्यक आहे, कोणती कागदपत्रे पाहावीत, घरबांधणीसाठी कोणती जागा योग्य आहे, कायद्यातील तरतुदी, मालमत्ता हस्तांतर अधिनियम - १८८२ कलम ५५, मालमत्ता खरेदीचे निकष याची सविस्तर माहिती या वेबसाईटवर आहे. खरेदी-विक्रीवेळी फसवणूक झालेल्या काही जणांची कथा रूपाने आॅडिओ क्लिपही या वेबसाईटवर आहे. (प्रतिनिधी)


मालमत्ता खरेदी-विक्रीवेळी फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे सर्वच घटकांना उपयोगी होईल, अशी ही वेबसाईट सुरू केली आहे. अल्पावधीतच मोठ्या संख्येने लोकांनी या वेबसाईटला भेट देऊन माहिती घेतली आहे. जमिनीविषयीच्या पुस्तकांनाही मागणी आहे.
- सतीश जोशी, पुणे

Web Title: Websites to avoid fraudulent transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.