दत्तवाड परिसरात अवैध धंद्यांना ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST2021-09-12T04:28:09+5:302021-09-12T04:28:09+5:30

दत्तवाड : कर्नाटकातून होणारी गुटख्याची तस्करी, अवैध दारू विक्री यासह अवैध व्यवसायामुळे दत्तवाडसह परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...

Weaving illegal trades in Dattawad area | दत्तवाड परिसरात अवैध धंद्यांना ऊत

दत्तवाड परिसरात अवैध धंद्यांना ऊत

दत्तवाड : कर्नाटकातून होणारी गुटख्याची तस्करी, अवैध दारू विक्री यासह अवैध व्यवसायामुळे दत्तवाडसह परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने अवैध दारूचा पूर देखील येणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर असणार आहे.

कुरुंदवाड पोलीस ठाण्यांतर्गत चोवीस गावांचा समावेश आहे. कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या गणेशवाडी, जुने दानवाड, दत्तवाड, पाच मैल, शिवनाकवाडी हे मार्ग कर्नाटक हद्दीकडे जातात. यामुळे कर्नाटकातील गुटखा महाराष्ट्रात आणून विकणाऱ्या अनेक टोळ्या निर्माण झाल्या आहेत. याबरोबरच गोवा बनावटीची दारू व हातभट्टीची दारू वितरणाचे जाळे निर्माण झाले आहे. यातून झटपट मिळणारा पैसा हा युवकांना खुणावत असल्याने अनेक युवक या व्यवसायात ओढले जात आहेत. यामुळे कर्नाटक सीमेवर असणाऱ्या गावात भुरट्या चोरीचे प्रमाणही जास्त आहे. शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरे व नदीकाठी असणाऱ्या विजेच्या मोटारीची केबल चोरीच्या घटना देखील वाढल्या आहेत. हे चोरटे चोरी करून कर्नाटकात पसार होत असल्याने त्यांना पकडणेही पोलिसांना अवघड बनत आहे. तर, सीमाभागात जुगाराचे अड्डे व मटका बिनदिक्कतपणे सुरू आहे. आर्थिक व्यवहारातून अनेकवेळा याठिकाणी मारामारीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे या व्यवसायाचा बीमोड करण्याचे आव्हान कुरुंदवाड पोलिसांसमोर आहे.

Web Title: Weaving illegal trades in Dattawad area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.