संपदा मानेला हवीय कोल्हापूरकरांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:19 IST2021-05-28T04:19:20+5:302021-05-28T04:19:20+5:30

कोल्हापूर : येथील गायिका संपदा माने हिने मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या रिॲलिटी शोच्या अंतिम फेरीत धडक ...

Wealth Kolhapurkar's support is needed | संपदा मानेला हवीय कोल्हापूरकरांची साथ

संपदा मानेला हवीय कोल्हापूरकरांची साथ

कोल्हापूर : येथील गायिका संपदा माने हिने मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या रिॲलिटी शोच्या अंतिम फेरीत धडक मारली असून तिला विजयी होण्यासाठी कोल्हापूरकरांची साथ हवी आहे. अंतिम फेरीतील विजेत्याची निवड मतांच्या आधारावर केली जाणार असल्याने कोल्हापूरकरांनी भरभरून मत नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वयाच्या चौथ्या वर्षांपासून संगीतसाधनेत रमलेल्या संपदा माने हिने संगीत विशारद या परीक्षेत भारतात दुसरा क्रमांक पटकावला असून ‘संगीत अलंकार’ या परीक्षेत ती पहिली आली आहे. अल्पावधीतच संगीत नाटकांमधून प्रमुख भूमिका करून सलग दोन वर्षे नाट्यपरिषदेचा मानाचा पुरस्कार मिळविला आहे. अभिजित कोसंबी, प्रल्हाद जाधव यांच्यानंतर आता संपदा माने हिने गाण्याच्या रिॲलिटी शोमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे, तरी तिला कोल्हापूरकरांनी भरभरून मते द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

फोटो नं २७०५२०२१-कोल-संपदा माने

--

Web Title: Wealth Kolhapurkar's support is needed