सभापतीपदाचा वापर लोकहितासाठी करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:16+5:302021-07-18T04:18:16+5:30
म्हाकवेः जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण सभापतीपदाची जबाबदारी खासदार संजय ...

सभापतीपदाचा वापर लोकहितासाठी करू
म्हाकवेः जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण
सभापतीपदाची जबाबदारी खासदार संजय मंडलिक, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोपवली आहे. या पदाचा वापर जनसामान्यांच्या हितासाठी करून नेतेमंडळींचा विश्वास सार्थ ठरवू, अशी ग्वाही महिला व बालकल्याण सभापती शिवानी विजयसिंह
भोसले यांनी दिली. नानीबाई चिखली(ता.कागल) येथे जि.प.च्या महिला व बालकल्याण
समिती सभापतीपदी झालेली निवड, छत्रपती शाहू पुरस्कार आणि वाढदिवस यानिमित्ताने ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्या वतीने येथे नागरी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी कागल तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष
अरुणराव भोसले होते.
हमिदवाडा कारखान्याचे उपाध्यक्ष
बापूसाहेब भोसले, 'बिद्री'चे
संचालक प्रवीणसिंह भोसले यांच्या हस्ते
व विजयसिंह भोसले, सदाशिव तुकान यांच्या उपस्थित हा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच छाया
चव्हाण,उपसरपंच मनीषा पाटील, जितेंद्र
पाटील,योगेश साबळे,रवींद्र ढेरे(शिंंदेवाडी),शुभम चौगले,वसंत चौगले, आण्णासो वाडकर, गणपती इंगळे, सचिन वाडकर, रवी वाडकर, प्रल्हाद देवडकर, श्रीधर डावरे, प्रसाद घोरपडे, अमर यादव, हर्षवर्धन घोरपडे, सरपंच विद्या शिंदे, समरजित घाटगे समर्थक यांच्यासह
विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भोसले यांना शुभेच्छा दिल्या.
१७ म्हाकवे शिवानी भोसले
कँप्शन-
नानीबाई चिखली येथे महिला व बालकल्याण सभापती शिवानी भोसले यांचा सत्कारप्रसंगी बापुसाहेब भोसले,प्रवीणसिंह भोसले,विजयसिंह भोसले,अरुणराव भोसले आदी.(छाया : जमीर नाईक,चिखली)