कुंभोजच्या विकासास निधी देण्यासाठी प्रयत्न करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:24 IST2021-04-08T04:24:03+5:302021-04-08T04:24:03+5:30

कुंभोज : ...

We will try to fund the development of Kumbhoj | कुंभोजच्या विकासास निधी देण्यासाठी प्रयत्न करू

कुंभोजच्या विकासास निधी देण्यासाठी प्रयत्न करू

कुंभोज : गावाच्या विकासास निधी मिळविण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून प्रयत्न करू, असे आश्वासन सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी दिले. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुंभोज (ता. हातकणंगले) येथील दौऱ्यादरम्यान त्यांनी येथील विविध पक्षीय कार्यकर्त्यांना आश्वासित केले.

ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामसचिवालयासह गावातील विकास कामांसाठी निधी देण्याच्या मागणीचे निवेदन मुश्रीफ यांना देण्यात आले. यावेळी सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दाविद घाटगे, ‘जवाहर’चे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, किरण माळी, माजी ग्रा.पं. सदस्य जहाँगीर हजरत, संतोष माळी, ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे, राष्ट्रवादी पक्ष तसेच नाविद मुश्रीफ विचार मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: We will try to fund the development of Kumbhoj