शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कारखान्याच्या एमडींना मारहाण: योग्य वेळी महाडिक गटाची ताकद दाखवू, अमल महाडिकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 11:55 IST

'राज्यातील सत्ता बदललेली आहे हे माजी गृहराज्यमंत्री विसरले'

कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना झालेल्या मारहाणप्रकरणी सत्तारूढ गटाचे नेते व कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक, सत्यजित कदम यांच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची मंगळवारी रात्री भेट घेतली. पोलिस अधीक्षकांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी महाडिक गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या दारात थांबून होते.भेटीनंतर महाडिक म्हणाले, राज्यातील सत्ता बदललेली आहे हे माजी गृहराज्यमंत्री विसरले आहेत. राजकीय वैरत्व जरूर असावे; परंतु अशा पद्धतीने एकमेकांवर हात उगारणे योग्य नाही. महाडिक परिवाराने अशा पद्धतीने कुणालाच कधी मारहाण केलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना यापूर्वी कधीही घडलेली नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना संयमाने राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. योग्यवेळी आल्यावर त्याला उत्तर दिले जाईल.

त्यांना कारखान्याच्या निवडणुकीतील पराभव पचवता आला नाही. नियोजन पद्धतीने त्यांनी हा हल्ला केला आहे. त्याचे चित्रीकरणही त्यांनी केली आहे. घडलेल्या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या कानांवरही याची माहिती घातली आहे. मारहाणीचे फुटेज व नावे पोलिसांना मिळाली आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलAmal Mahadikअमल महाडिक