बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देऊ -
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST2021-08-20T04:29:50+5:302021-08-20T04:29:50+5:30
इचलकरंजी : बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन राष्ट्रवादी कामगार संघटनेचे संस्थापक मिश्रीलाल जाजू यांनी दिले. ...

बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देऊ -
इचलकरंजी : बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन राष्ट्रवादी कामगार संघटनेचे संस्थापक मिश्रीलाल जाजू यांनी दिले.
शहापूर येथे बांधकाम महिला कामगारांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
जाजू म्हणाले की, स्व. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बांधकाम कामगारांच्या कल्याणाकरिता कायदा केला. कामगारांच्या कल्याणाकरिता विविध १८ योजना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविल्या जात आहेत; परंतु अजूनही बहुतांश बांधकाम कामगार विशेषत: महिला बांधकाम कामगारांची अजूनही मंडळाकडे नोंदणी झालेली नाही. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कामगारांची बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीसाठी राष्ट्रवादी कामगार संघटना पुढाकार घेऊन त्यांना सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देईल.
यावेळी राष्ट्रवादी कामगार संघटनेचे सरचिटणीस मदन मुरगुडे, उपाध्यक्ष शांताराम सोळवंडे, शिवदीप बंडगर, प्रशांत कोळी, पांडुरंग पांढरपट्टे, वर्षा कांबळे, सुरेखा पाटील, गीता पाटील, सुजाता पांढरपट्टे, अश्विनी पांढरपट्टे, प्रियांका करांडे आदी उपस्थित होते.