गांधीनगरसाठी जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:38 IST2021-05-05T04:38:04+5:302021-05-05T04:38:04+5:30
गांधीनगर वसाहत रुग्णालयात लसीच्या तुटवड्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर धीरज टेहलानी यांनी, गांधीनगरच्या लोकसंख्येच्या ...

गांधीनगरसाठी जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देऊ
गांधीनगर वसाहत रुग्णालयात लसीच्या तुटवड्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर धीरज टेहलानी यांनी, गांधीनगरच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लसींचा पुरवठा कमी होत आहे, तसेच रुग्णालयातील विविध समस्या आ. पाटील यांच्यासमोर मांडल्या. आरटीआय कार्यकर्ते अशोक चंदवानी यांनी, नागरिकांनाही लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यावर पाटील यांनी जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी प्रेम लालवाणी, प्रताप चंदवानी, रोहन बुचडे, गुड्डू सचदेव, सनी चंदवानी, जहिदा मुजावर उपस्थित होते.
फोटो : ३० गांधीनगर लसीकरण शुभारंभ
ओळ-
गांधीनगर वसाहत रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील कोविड लसीकरणाचा शुभारंभ आ. ऋतुराज पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी धीरज टेहलानी, डॉ. वेदक, डॉ. विद्या पॉल, डॉ. बीना रुईकर आदी उपस्थित होते. (छाया : बाबासाहेब नेर्ले)