शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठीच आग्रही राहू, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: June 18, 2024 18:15 IST

'तुम्हाला महामार्ग रेटायचाच आहे का?'

कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गविरोधात फक्त कोल्हापूरकरच नव्हे तर वर्धा ते गोव्यापर्यंतच्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. हा विरोध आणि असंतोष लोकसभेला मतपेटीतून देखील व्यक्त झाला आहे. त्यामुळे मी उद्या मुंबईला जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना हा विषय सांगेन. त्यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भूसे यांच्याशी चर्चा करून महामार्ग रद्द करण्यासाठीच आग्रही राहीन अशी ग्वाही आज, मंगळवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.शक्तीपीठ महामार्गविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, राजूबाबा आवळे, माजी आमदार के. पी. पाटील, संजयबाबा घाटगे, ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर, गिरीष फोंडे, विजय देवणे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी अमाेल येडगे व पालकमंत्री मुश्रीफ यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. खासदार शाहू छत्रपती यांनी महामार्गामुळे अनेक नागरिक भूमिहीन होणार असल्याने तो रद्द करावा असे मत मांडले.त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाला शेतकरी, व नागरिकांचा तीव्र विरोध आहे. लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर आले असताना विधिमंडळ सदस्यांनी महामार्ग रद्द करण्याची मागणी केली होती. यासह माजी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, भाजपचे कार्यकर्ते तसेच मी स्वत: असे महायुतीचे घटक पक्षदेखील यासाठी आग्रही आहेत त्यामुळे मी उद्या मुंबईत जाताच या विषयावर चर्चा होईल. सध्या भुसंपादनाच्या नोटिसा दिल्या जात असल्या तरी त्या आधी काढलेल्या आहेत. नव्याने नोटिसा काढलेल्या नाहीत.

तुम्हाला महामार्ग रेटायचाच आहे का?सतेज पाटील जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, पालकमंत्री स्वत: महामार्गाच्या विरोधात आहेत, जनतेचा प्रक्षोभ असताना दुसरीकडे प्रशासनातील तलाठी शेतकऱ्यांना नोटिसा देत आहे. म्हणजे तुम्हाला महामार्ग रेटायचाच आहे का, शिरोळ, कागल येथे नोटिसा चिकटवल्या जात आहेत. विरोध केला तरी तलाठी ऐकत नाहीत. तुम्ही आम्हाला शांत राहायला सांगता आणि नोटिसा काढता. तुम्हाला महामार्ग रेटून न्यायचाच असेल तर तसे सांगा, मग काय करायचे ते आम्ही ठरवू. अधिवेशनात महामार्गाचा निर्णय होईपर्यंत नोटिसा काढू नयेत. यावर जिल्हाधिकारी येडगे यांनी मी तलाठ्यांना तसे आदेश देईन असे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गHasan Mushrifहसन मुश्रीफChief Ministerमुख्यमंत्री