जवाहरच्या ऊस उत्पादकांना लिक्विड युरिया देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST2021-06-20T04:17:17+5:302021-06-20T04:17:17+5:30
हुपरी : युरिया खताची वाढती मागणी व वाया जाणा-या युरियाचे प्रमाण लक्षात घेऊन इफको कंपनीने युरिया रासायनिक खतास ...

जवाहरच्या ऊस उत्पादकांना लिक्विड युरिया देऊ
हुपरी : युरिया खताची वाढती मागणी व वाया जाणा-या युरियाचे प्रमाण लक्षात घेऊन इफको कंपनीने युरिया रासायनिक खतास पर्याय म्हणून द्रवरूप स्वरूपातील नॅनो युरिया लिक्विड पिकावरील फवारणी करिता उपलब्ध केले आहे. हे नॅनो युरिया लिक्विड बाजारात उपलब्ध होताच जवाहर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना त्याचा त्वरित पुरवठा सुरू करण्यात येईल, अशी माहिती जवाहर साखर कारखान्याचे केन कमिटी चेअरमन व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी दिली. कारखाना कार्यस्थळावरील बियाणे प्लॉटवर या नॅनो युरिया लिक्विडचे प्रात्यक्षिक गुरुवारी (ता.17) घेण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी संचालक सुरज बेडगे, अण्णासाहेब गोटखिंडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्राचे प्रमुख कृषी विद्यावेता डॉ. आर. आर. हसुरे, मुख्य शेती अधिकारी किरण कांबळे, इफको कंपनीचे अधिकारी विजय बुणगे, शेती अधिकारी भास्कर पट्टणकुडे, जयपाल गिरीबुवा, पंकज पाटील, अमित चौगुले, शामगोंडा पाटील आदी उपस्थित होते.
१९ जवाहर युरिया
--
फोटो ओळी -हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखाना कार्यस्थळावरील बियाणे प्लॉटवरती नॅनो युरिया लिक्विडचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, संचालक सुरज बेडगे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, किरण कांबळे, जयपाल गिरीबुवा, डॉ. आर. आर. हसुरे आदी उपस्थित होते.