तासगावला भरघोस निधी देऊ : आमदार आवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:17 IST2021-01-08T05:17:56+5:302021-01-08T05:17:56+5:30
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील बिनविरोध होणाऱ्या गावासाठी विशेष शासकीय निधी देण्याची घोषणा आमदार आवळे यांनी केली होती. त्यानुसार बिनविरोध ...

तासगावला भरघोस निधी देऊ : आमदार आवळे
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील बिनविरोध होणाऱ्या गावासाठी विशेष शासकीय निधी देण्याची घोषणा आमदार आवळे यांनी केली होती. त्यानुसार बिनविरोध निवड झाल्यानंतर गावातील नेतेमंडळी यांनी आमदार आवळे यांची भेट घेऊन गावचे नेते शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. यावेळी तानाजी पाटील, अर्जुन कोकाटे, अनिल गाडवे, कृष्णात पाटील, सदस्य चंद्रकांत गुरव उपस्थित होते.
शिवाजीराव पाटील म्हणाले, आमदार राजू आवळे यांनी बिनविरोध निवडणूक करण्यासाठी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. गावातील सर्व गट, तट एकत्र आले. गावची निवडणूक बिनविरोध झाली. आमदार आवळे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करीत आमदार निधी देऊन गावच्या विकासासाठी सहकार्य करावे.
यावेळी वडगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, हातकणंगले तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष कपिल पाटील, रामभाऊ लोकरे, मुकुंद पाटील, आदी उपस्थित होते.