ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी भरीव निधी देऊ : आमदार आवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST2021-02-23T04:36:09+5:302021-02-23T04:36:09+5:30
खोची (ता. हातकणंगले) येथे आमदार निधीतून मंजूर वीस लाख रुपये खर्चाच्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दसरा ...

ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी भरीव निधी देऊ : आमदार आवळे
खोची (ता. हातकणंगले) येथे आमदार निधीतून मंजूर वीस लाख रुपये खर्चाच्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दसरा चौक ते गणेश मंदिर डांबरीकरण, मडके गल्ली पेव्हिंग ब्लॉक बसविणे, चिखलगोंड पाणंद रस्ता मुरमीकरण या कामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बाजार समिती सभापती चेतन चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रा. बी. के. चव्हाण, पंचायत समिती सदस्य वसंतराव गुरव, वारणा दूध संघाचे संचालक दीपकराव पाटील, सरपंच जगदीश पाटील, उपसरपंच रोहिणी पाटील, काँग्रेसचे वडगाव शहराध्यक्ष सचिन चव्हाण, तालुकाध्यक्ष कपिल पाटील, सुशेनराव शिंदे-सरकार प्रमुख उपस्थित होते.
आ. राजू आवळे पुढे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या अडचणी असतील तर त्या भेटून सांगाव्यात. त्या सोडविल्या जातील. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी ग्रामपंचायतीला केले.
कार्यक्रमास महाविकास आघाडीचे भैरवनाथ पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सूर्यवंशी, शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, माजी उपसरपंच अमरसिंह पाटील, डॉ. अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुहास गुरव, अभिजित चव्हाण, प्रमोद गुरव, स्नेहा पाटील, पूनम गुरव, वैशाली वाघ, हणमंत पाटील, महावीर मडके, कृष्णात यशवंत, दिलीप कुरणे, चंद्रकांत चव्हाण, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी - खोची येथील विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार राजू आवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुशेनराव शिंदे, बी. के. चव्हाण, जगदीश पाटील, चेतन चव्हाण, अमरसिंह पाटील, अभिजित चव्हाण, आदी उपस्थित होते.