पालिकेच्या माध्यमातून प्राथमिक शाळांसाठी सर्वतोपरी सहकार्य करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:31 IST2021-09-08T04:31:21+5:302021-09-08T04:31:21+5:30
इचलकरंजी : सर्वच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मौलिक योगदानामुळे नगरपालिकेच्या प्राथमिक शाळांना पुन्हा गतवैभव प्राप्त होऊ लागले आहे. यशाचा हा आलेख ...

पालिकेच्या माध्यमातून प्राथमिक शाळांसाठी सर्वतोपरी सहकार्य करू
इचलकरंजी : सर्वच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मौलिक योगदानामुळे नगरपालिकेच्या प्राथमिक शाळांना पुन्हा गतवैभव प्राप्त होऊ लागले आहे. यशाचा हा आलेख असाच उंचावत न्यावा. पालिकेच्या माध्यमातून प्राथमिक शाळांसाठी सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी दिले.
येथील राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. वैशाली नायकवडी यांनी, प्राथमिक स्तरावर बालकांना घडवायचे जिकीरीचे काम शिक्षक मनापासून करत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना भावी पिढी अधिक सक्षम कशी होईल याकडे लक्ष द्यावे, असे सांगितले. बदलत्या काळानुरुप विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी पालिकेकडून सर्वच विद्यार्थ्यांना टॅब देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिक्षण सभापती मनोज साळुंखे यांनी सांगितले. प्रशासन अधिकारी नम्रता गुरसाळे यांनी स्वागत केले. या वेळी बहुउपयोगी साहित्याचा एक संच पालिकेच्या शिक्षण विभागकडून प्रत्येक शाळेला देण्यात आला. कार्यक्रमास शिक्षक संघाचे अध्यक्ष किरण दिवटे, समितीचे अध्यक्ष राजेंद्र घोडके, संजय आवळे, गौस पटेल, मोहन वाघमारे, विजय कोळी, बाबाजान जमादार, अलका कोरे आदींसह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन पी. ए. पाटील यांनी केले. रवींद्र मोरे यांनी मानले.
फोटो ओळी
०९०७२०२१-आयसीएच-०६
राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. या वेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, मनोज साळुंखे आदी उपस्थित होते.