शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

सर्वांना न्याय देणारे तुमच्या मनातील सरकार राज्यात आणू, राहुल गांधींसमोर सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

By भीमगोंड देसाई | Updated: October 5, 2024 14:23 IST

कोल्हापूर : कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत भारत जोडो यात्रा काढून आणि मणिपूर ते मुंबईपर्यंत न्याय यात्रा काढून महिला, युवक, शेतकऱ्यांना ...

कोल्हापूर : कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत भारत जोडो यात्रा काढून आणि मणिपूर ते मुंबईपर्यंत न्याय यात्रा काढून महिला, युवक, शेतकऱ्यांना आधार देणारे काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या मनातील, न्याय विचाराचे सरकार महाराष्ट्रात आणू, असा विश्वास काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयाच्या उदघाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमातील प्रास्ताविकात त्यांनी खासदार गांधी यांना हे आश्वासन त्यांच्या उपस्थितीतच दिले. यावेळी गांधी यांनीही हसून त्यांना दाद दिली.आमदार पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे यंदाचे ३५० वे वर्ष आहे. या वर्षातच कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होते हे विशेष आहे. कसबा बावडा ही राजर्षी शाहू महाराज यांची जन्मभूमी आहे. या भूमीत अठारा पगड जातींच्या कल्याणासाठी उत्तुंग कामगिरी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण न्याय, समता, निर्भयतेसाठी लढणारे राहूल गांधी यांच्या हस्ते होत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो, न्याय यात्रेच्या माध्यमातून भयभयीत झालेल्या घटकाला आधार दिला. त्यांच्या मनातील सर्वांना न्याय देणाऱ्या विचाराचे सरकार राज्यात आणू.खासदार शाहू छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याकाळात अन्यायाविरोधात आवाज उठवला. सर्वांना बरोबर घेवून धर्मनिरपेक्षतेची विचारधारा रूजवली. पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाची प्रेरणा सातत्याने मिळत राहील.विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा क्षण सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कसबा बावड्यात, कोल्हापुरात दिवाळी साजरी होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांचे भाषण झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलRahul Gandhiराहुल गांधीGovernmentसरकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी