कुंभोजच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:29 IST2021-08-25T04:29:56+5:302021-08-25T04:29:56+5:30

दरम्यान, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थींना पेन्शन मंजूर प्रमाणपत्रांचे वाटप, तसेच कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल युवानेते किरण माळी, ...

We will always strive for the overall development of Kumbhoj | कुंभोजच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू

कुंभोजच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू

दरम्यान, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थींना पेन्शन मंजूर प्रमाणपत्रांचे वाटप, तसेच कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल युवानेते किरण माळी, ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे, अमोल शिंदे, तसेच महावितरण कर्मचाऱ्यांचा आमदार आवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पूरग्रस्तांना सरसकट नुकसानभरपाई मिळावी, कोरोनाने निराधार बनलेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावे, मंजूर मंडळ अधिकारी कार्यालय सुरू करावे, आदी मागण्या आमदार आवळे यांच्याकडे करण्यात आल्या. कार्यक्रमास उपसरपंच दाविद घाटगे, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच प्रकाश पाटील, किरण नामे, सुनील भोसले, डॉ. धर्मवीर पाटील, सदाशिव महापुरे, सचिन कोळी आदी उपस्थित होते. जहांगीर हजरत यांनी प्रास्ताविक केले. किरण नामे यांनी आभार मानले.

Web Title: We will always strive for the overall development of Kumbhoj