अन्नपूर्णा साखर कारखाना चालवायलाही सहकार्य करू : मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST2021-02-05T07:01:15+5:302021-02-05T07:01:15+5:30
वंदुर (ता.कागल) येथे विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार संजय घाटगे एका व्यासपीठावर आले होते. काही ...

अन्नपूर्णा साखर कारखाना चालवायलाही सहकार्य करू : मुश्रीफ
वंदुर (ता.कागल) येथे विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार संजय घाटगे एका व्यासपीठावर आले होते. काही दिवसांपूर्वी संजय घाटगे यांनी यापुढे निवडणूक लढविणार नाही असे जाहीर केले होते. त्याचा संदर्भ घेत संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष धनराज घाटगे यांनी आमच्या नेत्याला कोणी कमी समजू नये. असे म्हणून मंत्री मुश्रीफ सध्या ग्रामविकासमंत्री आहेत. ते उपमुख्यमंत्री व्हावेत आणि त्यांनी संजयबाबाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले. हा संदर्भ घेत मंत्री मुश्रीफ यांनी हे विधान केले. तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात मी, संजय मंडलिक आणि संजय घाटगे एकत्रच आहोत. कोणी गैरसमज करून घेऊ नये. यावेळी युवराज पाटील, भय्या माने, रमेश तोडकर उपस्थित होते.
म्हणून मी आमदार...
मंत्री मुश्रीफ म्हणाले की सहा वेळा माझी आणि संजय घाटगे यांची लढत झाली. पाच वेळा त्यांचा पराभव झाला. मतांमध्ये फार अंतर नव्हते. त्यांचे कर्तृत्वही कमी नव्हते. पण नियतीने मला साथ दिली. त्यातही ते एक मार्गी आणि मी लागलो बुद्धीने तेज. त्यांच्याच लोकांना हातळण्याची माझी सवय कामी आली. समयसूचकता दाखवित सगळे करीत गेलो. असे असले तरी पाच पराभवानंतरही गट शाबूत ठेवणे. सत्ता नसतांना लोकांना सांभाळने खूप अवघड असते. म्हणून त्यांना कमी समजता येणार नाही.