‘आम्ही शियेकर’ व्हॉट्सअॅप ग्रुपतर्फे स्वच्छता अभियान
By Admin | Updated: October 3, 2015 01:08 IST2015-10-03T01:08:13+5:302015-10-03T01:08:13+5:30
गांधी जयंती : पंचगंगा पाणवठ्याची सफाई

‘आम्ही शियेकर’ व्हॉट्सअॅप ग्रुपतर्फे स्वच्छता अभियान
कोल्हापूर : सातत्याने होणाऱ्या गैरवापरामुळे व्हॉटसअॅप हे तंत्रज्ञान बदनाम झाले असले तरी याच्या माध्यमातून विधायक काम करता येते हे ‘आम्ही शियेकर’ व्हॉट्सअॅप ग्रुपतर्फे दाखवून देण्यात आले. शिये (ता. करवीर) येथील विविध स्तरातील लोकांनी ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत गांधी जयंतीचे औचित्य साधून हनुमाननगर येथील पाणवठ्यावर स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत ग्रुपच्या ३५ ते ४० सदस्यांनी सहभाग घेतला.
पंचगंगेची पाणीपातळी घटल्याने विसर्जित झालेल्या गणेशमूर्ती उघड्या झाल्या होत्या. या मूर्ती एकत्र करून त्यांचे मुख्य प्रवाहात विसर्जन करण्यात आले. काठावर असणारे निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या, आदी कचरा एकत्र करून नष्ट करण्यात आला. पाणवठा स्वच्छ करण्यात आला.
या मोहिमेत उद्योजक मोहन पाटील, बदाम पाटील, सागर शिंदे, ग्रा. पं. सदस्य रणजित कदम, प्रवीण चौगले, तसेच जय शिंदे, उत्तम पाटील, उत्तम गाडवे, विनायक रेठरेकर, विजय पाटील, रत्नाकर कोळी, प्रवीण चव्हाण, सतीश पाटील, सागर सातपुते, मनोज ठोंबरे, नागेश कदम, साहील कुरणे, संतोष कुरणे, दीेपक मालेकर, उमेश मालेकर, अमर जाधव, श्रेयश शिंदे, स्वराज चरणकर, वेदांत चरणकर, निखिल चव्हाण यांच्यासह इतर सदस्यांनी भाग घेतला.
ग्रुप अॅडमिन विश्वास चरणकर यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर प्रवीण चव्हाण यांच्यातर्फे अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. (प्रतिनिधी)