माणूस घडविणारी शिक्षण पद्धती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:24 IST2021-09-19T04:24:48+5:302021-09-19T04:24:48+5:30

म्हाकवेः नोकरी मिळवणे व ज्ञानी होण्याबरोबरच स्वावलंबी माणूस घडविणाऱ्या शिक्षणपद्धतीची गरज आहे. ...

We need man-made learning methods | माणूस घडविणारी शिक्षण पद्धती हवी

माणूस घडविणारी शिक्षण पद्धती हवी

म्हाकवेः नोकरी मिळवणे व ज्ञानी होण्याबरोबरच स्वावलंबी माणूस घडविणाऱ्या शिक्षणपद्धतीची गरज आहे. त्यादृष्टीने प्राथमिक शिक्षण पाऊल टाकत असून त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. अंगणवाडीला प्राथमिक शिक्षणाच्या कक्षेत घेण्याचे नवे शैक्षणिक धोरण क्रांतिकारी ठरेल, परंतु यापूर्वीच्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे हे धोरणही बासनात गुंडाळू नये असे आवाहन डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी केले.

बानगे(ता.कागल)येथे "नवीन शैक्षणिक धोरण" या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी डॉ.जी.बी.कमळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राथमिक शिक्षण हाच सक्षम पिढी निर्माण करणारा पाया आहे.त्यामुळे इतर देशात याबाबत गांभीर्याने घेतले जाते.तेवढे गांभीर्य इथं जाणवत नसल्यानेच आपल्या देशात अपेक्षित बदल दिसत नाहीत.शैक्षणिक धोरणे चिरकाल टिकणारी असावीत असेही डॉ. लवटे यांनी मत व्यक्त केले.

यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी आर.एस.गावडे,एम.बी.जाधव,रामचंद्र कोंडेकर,महादेव नलवडे यासह शिक्षक उपस्थित होते.जयवंत बलुगडे यांनी आभार मानले.

१८ बानगे सुशिलकुमार लवटे

बानगे येथे नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विचार मांडताना डॉ. सुशीलकुमार लवटे. यावेळी डॉ. जी.बी.कमळकर, आर. एस. गावडे आदी

Web Title: We need man-made learning methods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.