हॉटेलमध्ये काम करत शिकलो...

By Admin | Updated: June 11, 2014 01:21 IST2014-06-11T01:20:53+5:302014-06-11T01:21:22+5:30

विद्यार्थी शहाजी बाळू गुरव याने मिळविले ८१.५३ टक्के गुण

We learned to work in the hotel ... | हॉटेलमध्ये काम करत शिकलो...

हॉटेलमध्ये काम करत शिकलो...

कोल्हापूर : आपल्या शिक्षणासाठी हॉटेलमध्ये काम करत गोखले कॉलेजच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थी शहाजी बाळू गुरव याने ८१.५३ टक्के गुण मिळविले. शहाजीला सी. ए. व्हायचे असून त्यासाठीची आर्थिक तरतूद कशी करावी, या विचारात तो आहे. मी स्वत:च्या कष्टाच्या पैशातून शिकलो याचा अभिमान मात्र आज त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. शहाजी बाजार भोगावमधील मानवाड गावचा. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शहाजीच्या वडिलांची थोडी जमीन आहे. त्यातून फारसे उत्पन्न निघत नाही. शहाजीला शिक्षणाची आस असल्याने त्याने कोल्हापूर गाठले आणि गोखले कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला. रोज ये-जा करणे शक्य नव्हते शिवाय शिक्षणासाठी खिशात पैसेही नव्हते. सहा महिन्यानंतर त्याने अभ्यासात स्वत:ला झोकून दिले. त्याच्या या कष्टाचे फळ म्हणून ८१ टक्के गुण मिळाले. त्याला सी. ए. व्हायचे आहे; पण त्यासाठीही भरमसाठ फी असणार आहे. त्यासाठीची तरतूद कशी करावी, याचा विचार केलेला नसला तरी शिक्षणासाठीची त्याची जिद्द कायम आहे.

Web Title: We learned to work in the hotel ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.