आम्ही कोणालाही कमिटमेंट दिलेली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST2021-09-26T04:26:58+5:302021-09-26T04:26:58+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात आम्ही कोणालाही कमिटमेंट दिलेली नाही. लोकशाहीत मागणी करायला ...

We have not made a commitment to anyone | आम्ही कोणालाही कमिटमेंट दिलेली नाही

आम्ही कोणालाही कमिटमेंट दिलेली नाही

लाेकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात आम्ही कोणालाही कमिटमेंट दिलेली नाही. लोकशाहीत मागणी करायला कोणी अडवू शकत नाही, अजून पक्की यादी व्हायची आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिरोळ तालुक्यातून विकास संस्था गटातून राजेंद्र पाटील यांना दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी आव्हान दिले आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी गणपतराव पाटील यांच्यासाठी प्रयत्न सुरू केले असून शुक्रवारी ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन गणपतराव पाटील यांच्या उमेदवारीची मागणी केली. जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत पाच वर्षांनंतर थांबण्याची कमिटमेंट पाटील-यड्रावकर यांनी दिल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. याबाबत राज्यमंत्री पाटील म्हणाले, आम्ही कोणालाही कमिटमेंट दिलेली नाही. कोणाशीही चर्चा झालेली नव्हती. लोकशाहीमध्ये कोणाला भेटालया, बोलायला अडवू शकत नाही. आता कच्ची मतदार यादी झालेली आहे. पक्की झाल्यानंतर बघू.

Web Title: We have not made a commitment to anyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.