शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

आम्ही बावड्यापुरतं बंटी पाटलांचं ऐकायचं ठरवलंय; मंत्री मुश्रीफ यांचा टोला आणि सतेज यांनी दिले प्रत्युत्तर -video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:40 IST

मुश्रीफ आणि पाटील यांच्यात टोलेबाजी रंगली

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीनंतर शाहू महाराजांना अभिवादन करण्याच्या निमित्ताने पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील पहिल्यांदाच एकत्र आले. त्यामुळे या सर्वांच्या बोलण्याकडे कार्यकर्त्यांचे बारीक लक्ष होते.शाहू महाराजांना अभिवादन झाल्यानंतर सर्वजण बाहेर पडताना नेहमीच्या पद्धतीने सतेज पाटील यांच्या मागून जाताना मुश्रीफ म्हणाले, आम्ही बावड्यापुरतं बंटी पाटलांचं ऐकायचं ठरवलंय. दुसऱ्यांदा त्यांनी हे वाक्य बोलून दाखवलं. त्यावर सतेज पाटील यांनीही ‘शाहू महाराजांचा जन्म आमच्या गावात झालाय हे लक्षात ठेवा’ असे मुश्रीफ यांना सांगितले. हे सगळे ऐकण्यासाठी खासदार शाहू छत्रपती हे पाठीमागेच होते.जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलणाऱ्या ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीनंतर हे सर्व नेतेमंडळी पहिल्यांदा एकत्र आल्याने साहजिकच माध्यम प्रतिनिधीही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या देखत मुश्रीफ आणि पाटील यांच्यात ही टोलेबाजी रंगली. दिवसभर ती सोशल मीडियावरही जोरदार चर्चेत राहिली.