शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आमचं ठरलंय विकास आघाडीची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 16:03 IST

आमचं ठरलंय विकास आघाडीला राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी दिली आहे. ही नोंदणी केवळ महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आहे.

ठळक मुद्देआमचं ठरलंय विकास आघाडीची राजकीय पक्ष म्हणून नोंदणीआमचं ठरलंयने लोकसभेचा निकाल फिरला!

कोल्हापूर : आमचं ठरलंय विकास आघाडीला राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी दिली आहे. ही नोंदणी केवळ महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आहे. आघाडीचे अध्यक्ष प्रमोद दिनकर पाटील हे पालकमंत्री सतेज पाटील यांचे कार्यकर्ते असून लोकसभा निवडणुकीत मंत्री पाटील यांची आमचं ठरलंय ही टॅगलाईन चांगलीच गाजली होती.आमचं ठरलंय आघाडीचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी राजकीय पक्षांची नोंदणी आदेश, २००९ नुसार आपल्या पक्षाची नोंदणी करण्याबाबतचा प्रस्ताव १५ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यापूर्वी जनतेकडून नोंदणीबाबत राजपत्रातील सूचना, हरकती मागवल्या होत्या.

याबाबत एकही हरकत आयोगाकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळे ह्यआमचं ठरलंय आघाडीह्ण हा पक्ष राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. याबाबत, पक्षाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.आमचं ठरलंयने लोकसभेचा निकाल फिरला!लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविरोधात उघड दंड थोपटले होते. आमचं ठरलंय या टॅगलाईनद्वारे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा जोरदार प्रचार केला होता. ही टॅगलाईन इतकी गाजली, की त्यामुळे लोकसभेचा निकाल फिरला होता.

टॅग्स :PoliticsराजकारणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर