शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठीही ‘आमचं ठरलंय’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 03:08 IST

उद्धव ठाकरे; १४ खासदारांसह घेतले अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर : दोन, चार पदांसाठी आम्ही भाजपशी युती केलेली नाही. ती हिंदुत्वासाठी केलेली आहे. अमित शहा आता जे काश्मीरमध्ये करू इच्छितात त्यासाठी आम्ही युती केली आहे. आमची युती मजबूत आहे. हक्काने काही म्हणणे मांडणं म्हणजे नाराजी नव्हे. युती कदापिही तुटू देणार नाही. विधानसभेसाठी ‘आमचं ठरलंय’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका गुरुवारी स्पष्ट केली.

शिवसेनच्या १८ पैकी १४ विजयी खासदारांसह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी अंबाबाईचे दुपारी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय अवजड उद्योेग मंत्री अरविंद सावंत उपस्थित होते. १६ जूनला खासदारांसह आपण अध्योध्येला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाकरे म्हणाले, आम्ही अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन युतीची पहिली सभा कोल्हापुरात घेतली. उपस्थितांच्या रूपाने जे अंबाबाईचे विराट रूप आम्हाला दिसले तेव्हा मी या गर्दीला सलाम केला होता. आता पुन्हा नतमस्तक होण्यासाठी आलो होतो.

युतीचे तुमचे जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा ठरला आहे असे विचारल्यावर ते म्हणाले, विधानसभेसाठी आमचं ठरलंय. काही अडचण नाही. युती मजबूत आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर मी आणि आदित्य रविवारी जाणार आहोत. चारा छावण्यांमध्ये जे शेतकरी राहत आहेत त्यांसाठी अन्नधान्य घेऊन जाणार आहोत. सरकार त्यांच्या परीने चांगले काम करीत आहे. परंतु, एकटे सरकार पुरे पडणार नाही. दुष्काळग्रस्तांची आपुलकीने चौकशी करायला आम्ही जाणार आहोत. त्यांच्यासाठी करेल तेवढं थोडं आहे; मात्र दिलासा देणे गरजेचे आहे.

बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती‘राज्यात युतीची सत्ता यावी आणि कोल्हापूरचे दोन खासदार शिवसेनेचे येऊ देत, तुझी खणानारळाची ओटी भरीन’अशा शब्दात शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी करवीर निवासिनी अंबाबाईला बोललेले नवस गुरुवारी त्यांचे सुपुत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी फेडले. ठाकरे परिवाराने केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्यासह १४ खासदारांसोबत अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले, तसेच देवीला साडी, खणानारळाची ओटी भरली. ‘शिवसेनेवर यापुढेही अशीच कृपा ठेव’ अशी भावनिक साद उद्धव ठाकरे यांनी देवीला घातली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा