आम्ही लस घेतली ... तुम्ही पण घ्या....! शिक्षकांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:36 IST2021-02-26T04:36:10+5:302021-02-26T04:36:10+5:30

कोरोना प्रादुर्भावादरम्यान माध्यमिक तसेच प्राथमिक शिक्षकांनी कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य निभावले आहे. परिणामत: आरोग्य तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनंतर शिक्षकांनाही लस ...

We got vaccinated ... you take it too ....! Teacher appeal | आम्ही लस घेतली ... तुम्ही पण घ्या....! शिक्षकांचे आवाहन

आम्ही लस घेतली ... तुम्ही पण घ्या....! शिक्षकांचे आवाहन

कोरोना प्रादुर्भावादरम्यान माध्यमिक तसेच प्राथमिक शिक्षकांनी कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य निभावले आहे. परिणामत: आरोग्य तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनंतर शिक्षकांनाही लस देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. परिणामी जिल्ह्यात सर्वत्र शिक्षकांना कोरोना लस दिली जात आहे.

कोरोना लसीकरणादरम्यान लस घेतल्यानंतर काहींना त्रास झाल्याच्या माध्यमातील वृत्तांमुळे तसेच ऐकीव बातम्यांमुळे अनेकजण कोरोनाची लस घेऊ की नको, घेऊ पण थोडे थांबून घेऊ अशा मनःस्थितीत असल्याचे दिसून येत आहे.अशा पार्श्र्वभूमीवर लसीकरणाच्या पहिल्या-दुसऱ्या दिवशी बिनधास्तपणे लस घेणारे शिक्षक इतर सहकाऱ्यांना व्हॉटस्ॲप मेसेजसह फोटो पाठवून तसेच स्टेटसला लसीकरण केंद्रातील फोटो ठेवून आम्ही लस घेतली..आता तुम्ही पण घ्या, अशा आशयाच्या पाठवित असलेल्या मेसेजद्वारे त्यांच्याकडून लसीकरणाबाबत एकप्रकारे प्रबोधन घडताना पहायला मिळत आहे.

फोटो ओळी- केर्ले, ता.करवीर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मनीषा गुरव यांनी कोरोना लस घेतल्यानंतर त्यांनी व्हॉटस्ॲपला ‘मी लस घेतली तुम्ही ही घ्या’ असा स्टेट्स ठेवला.

Web Title: We got vaccinated ... you take it too ....! Teacher appeal