शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

...पण आम्ही घरी जाऊ शकत नाही....: नि:शब्द, काळीज चिरणारा; आवाहनाला साद देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 21:44 IST

असाच काळीज चिरणारा, नि:शब्द करणारा अवघा सव्वा मिनिटाचा व्हिडीओ आता कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून तो तयार करण्यात आला आहे. त्यातून तरी हुल्लडबाजी करणाऱ्यांनी, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांनी मानवी मनाला मुरड घालण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर पोलीस दलाचा व्हिडीओ शासनाच्या आवाहनास साथ देऊया, घरीच थांबून ‘कोरोना’वर मात करूया.

कोल्हापूर : पोलीस हासुद्धा माणूसच आहे. त्याला कोरोना विषाणूची भीती नाही का?, तेसुद्धा कोणाचे तरी पती, पत्नी, वडील, आई, भाऊ, बहीण आहेतच. काळजी करणारं आपल्यासारखं त्यांचंही कुटुंब आहेच. त्यांनासुद्धा घर आहे, त्यांच्याही घरी त्यांची चिमुकली मुलं, वृद्ध माता-पिता वाट पाहतात.... पण तरीही ते घरी जाऊ शकत नाहीत. का? तर ते तुम्हां-आम्हांला आपलं कुटुंब मानतात आणि त्याची काळजी घेणं हेच ते प्रथम कर्तव्य समजतात.

असाच काळीज चिरणारा, नि:शब्द करणारा अवघा सव्वा मिनिटाचा व्हिडीओ आता कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून तो तयार करण्यात आला आहे. त्यातून तरी हुल्लडबाजी करणाऱ्यांनी, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांनी मानवी मनाला मुरड घालण्याची वेळ आली आहे.

 

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभर थैमान माजले आहे. जिवावर उदार होऊन डॉक्टर, पत्रकार, सफाई कामगारांसह पोलीस सेवा बजावताना पावलोपावली दिसत आहेत. यांनाही मन आहे, त्यांची घरी काळजी करणारे आहेतच. त्यांनाही बाहेर जाऊ नको म्हणून त्यांची चिमुकली मुलं साद देत आहेत. पण सेवा हेच प्रथम कर्तव्य मानून पोलीस दुस-यांच्या कुटुंबांची काळजी करीत आहेत.‘कोरोना’बाधित व्यक्तीचा संपर्क होऊ नये म्हणून पोलीस दल आटापिटा करीत आहे. तरीही काहीजण रस्त्यांवर भटकतात. त्यांना रोखण्यासाठी पोलीस दलाचा व्हिडीओ मनाला भावणारा आहे.

मला दोन लहान मुली आहेत... माझ्या घरी माझी आई आहे... पण आम्ही घरी जाऊ शकत नाही... आम्ही कोल्हापूर पोलीस आहोत आणि तुम्हीदेखील आमचे कुटुंबच आहात... कृपया, आम्हांला साथ द्या... तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी घरीच थांबा... आपल्या कोल्हापूरसाठी घरीच थांबा... काळजी करू नका, तुमच्यासाठीच आहोत आम्ही... घरी सुरक्षित जाण्यासाठी आम्हांला सहकार्य करा... आपल्या सर्वांना हे शक्य आहे... अडचण असल्यास १०० नंबरवर डायल करा... अशा पद्धतीने कोल्हापूर पोलिसांनी भावनिक साद घातली आहे. व्हिडीओमध्ये शहरातील संवेदशील ठिकाणी उभे राहून कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचारी बंधू, भगिनींनी हातात कागदावर लिहिलेल्या आपल्या भावना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

स्वत:चे कुटुंब सोडून, पोलीस दल तुम्हांलाच आपले कुटुंब मानून तुमच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरत असतील तर आपणही प्रशासनाचा एक भाग बनू या. शासनाच्या आवाहनास साथ देऊया, घरीच थांबून ‘कोरोना’वर मात करूया. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या