शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधरसाठी भय्या मानेंची उमेदवारी आम्ही मेरीटवर मागतोय : मंत्री मुश्रीफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:35 IST

विद्यमान आमदार अरुण लाड हे तुतारीकडे असले तरी..

कागल : गेली पंचवीस वर्षे भय्या माने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका हाताळीत आहेत. सिनेट सदस्य म्हणून शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये ते परिचित आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी त्यांची उमेदवारी योग्य व अचूक आहे. म्हणून त्यांचे तिकीट आम्ही पक्षाकडे मेरीटवर मागत आहोत, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भय्यासाहेब माने यांच्या संभाव्य उमेदवारीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पदवीधर मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी युवराज पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ, बाजार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, सतीश पाटील, वसंतराव धुरे, चंद्रकांत गवळी, प्रकाश गाडेकर, आदी प्रमुख उपस्थित होते.मंत्री मुश्रीफ म्हणाले की, जिल्ह्यात उच्चांकी मतदार नोंदणी करून उमेदवारीचा दावा प्रबळ करावा. आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आग्रह करून भय्यांना उमेदवारी आणण्याची जबाबदारी माझी आहे. कारण पक्ष स्थापनेपासून आमच्या जिल्ह्यात विधानपरिषद मिळालेली नाही. भय्या माने म्हणाले, गतवेळीच मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, क्रांतिअग्रणी जी.डी. बापूंच्या मुलासाठी म्हणून आपण माघार घेतली. विकास पाटील यांनी स्वागत केले. प्रवीण काळबर यांनी आभार मानले.

अरुण लाड अधून-मधून अजित पवार यांना भेटत असतातगत निवडणुकीत विद्यमान आमदार अरुण लाड यांच्यासाठी भय्या मानेंनी घेतलेली मेहनत सर्वांना माहीत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ५२ टक्के मतदान झाले होते. म्हणून आता अरुण लाड व त्यांचे चिरंजीव शरद यांनी भय्यांना पाठिंबा द्यावा. आ. लाड हे तुतारीकडे असले तरी अधून-मधून ते अजित पवार यांना भेटत असतात, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.