शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

‘आमचं ठरलंय’ आता प्राधिकरण नकोच, ४० गावांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:53 IST

त्रासदायक ठरत असल्याचे स्पष्ट करत कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण रद्द करण्याचा निर्धार विविध ४० गावांनी केला. आता प्राधिकरण नकोच असं ‘आमचं ठरलंय’. आमचा उद्रेक होण्याची वाट सरकारने पाहू नये, असा इशारा या गावांमधील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिनिधींनी दिला

ठळक मुद्दे‘आमचं ठरलंय’ आता प्राधिकरण नकोच ४० गावांचा निर्धार; उद्रेक होण्याची वाट पाहू नका

कोल्हापूर : त्रासदायक ठरत असल्याचे स्पष्ट करत कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण रद्द करण्याचा निर्धार विविध ४० गावांनी केला. आता प्राधिकरण नकोच असं ‘आमचं ठरलंय’. आमचा उद्रेक होण्याची वाट सरकारने पाहू नये, असा इशारा या गावांमधील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिनिधींनी दिला.येथील अजिंक्यतारा कार्यालयात आमदार सतेज पाटील यांनी प्राधिकरणामध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांच्या अडचणी समजून घेण्यासाठी बैठक घेतली.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत म्हणाले, ‘प्राधिकरणातील गावांची स्थिती बिकट आहे. आमचा उद्रेक होण्याची वाट सरकारने पाहू नये.’ वडणगेचे सरपंच सचिन चौगुले म्हणाले, प्राधिकरणाबाबत पालकमंत्र्यांनी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. पाचगावचे संग्राम पाटील म्हणाले, बांधकाम परवाने कमी खर्चात, वेळेत देण्याचा निर्णय लवकर व्हावा.

वाशीचे संदीप पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड वगळता राज्यातील कोणतेही प्राधिकरण यशस्वी झालेले नाही; त्यामुळे आम्हाला प्राधिकरण नको. निगवेचे दिनकर आडसूळ म्हणाले, प्राधिकरणाने जमिनी घेतल्या, तर पिकवून काय खायचे हा प्रश्न आहे. नागरिक, शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणारे प्राधिकरण रद्द व्हावे.

शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे म्हणाले, विकास करण्याऐवजी त्रास होणार असेल, तर मग प्राधिकरण कशाला? आमच्या ग्रामपंचायती सक्षम आहेत. सध्या प्राधिकरण महापुरात वाहून गेल्यासारखी स्थिती आहे.या बैठकीत आमदार पाटील यांनी मार्गदर्शन केले. शरद निगडे, अशोक पाटील, अमर मोरे, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिंगणापूरचे अर्जुन मस्कर, वळीवडेचे प्रकाश शिंदे, गडमुडशिंगीचे प्रदीप झांबरे, गोकुळ शिरगावचे सरपंच एम. के. पाटील, शंकरराव पाटील, सर्जेराव मिठारी, संदीप पाटील, के. पी. पाटील, साताप्पा कांबळे, उजळाईवाडीचे डी. जी. माने, काकासो पाटील, उत्तम आंबवडे, नंदकुमार मजगे, सुनील गुमाने, न्यू वाडदेचे दत्तात्रय पाटील, सचिन कुर्ले, चिंचवाडचे अनिल पाटील, गांधीनगरचे सेवाराम तलरेजा, मोरेवाडीच्या सुनंदा कुंभार, तामगावचे निवास जोंधळेकर, बालिंगा अतुल बोंद्रे, आदी उपस्थित होते.प्राधिकरणाविरोधातील गावेपाचगाव, शिंगणापूर, वळीवडे, कंदलगाव, निगवे दुमाला, न्यू वाडदे, उजळाईवाडी, पीरवाडी, नेर्ली, तामगाव, वडणगे, कळंबा, मोरेवाडी, बालिंगा, नागदेववाडी, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, टोप-संभापूर, आंबेवाडी, प्रयाग चिखली, उचगाव, शिरोली पुलाची, कणेरीवाडी, कणेरी, भुयेवाडी, पाडळी खुर्द , आदी गावांचा प्राधिकरणाला विरोध आहे. गांधीनगर, गडमुडशिंगी, चिंचवाड ग्रामपंचायतीतील काही सदस्यदेखील विरोधात आहेत.परवान्यांबाबत ग्रामपंचायतींना पत्रे द्यागावठाण हद्दीतील बांधकाम परवाने ग्रामपंचायतींकडून देण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप त्याबाबत काहीच झालेले नाही. परवाने देण्याबाबतचे पत्र प्राधिकरणाने ग्रामपंचायतींना द्यावे, अशी मागणी नेर्लीचे प्रकाश पाटील यांनी केली.

प्राधिकरणाबाबत सरपंच, सदस्यांनी मांडलेल्या अडचणी१) गुंठेवारी झालेल्या प्लॉटवर बांधकाम परवाने व ग्रामपंचायतींना विकासात्मक कामांच्या मंजुरी मिळविणे कठीण झाले आहे.२) गावठाणमधील बांधकाम परवाना घेताना नगररचना कार्यालयाचा अभिप्राय घ्यावा लागतो. त्यास विलंब होत असल्याने लोकांना बँक कर्ज मिळविण्यात अडचण निर्माण होत आहे.३) ग्रामपंचायतींच्या अधिकारावर गदा आल्याने ग्रामपंचायतींच्या विकासाला मर्यादा आली आहे.४) प्राधिकरणाच्या बांधकाम शुल्काचा परिणाम ग्रामीण भागात इमारती बांधताना होत आहे; त्यामुळे नवे बांधकाम होण्यात अडथळे निर्माण होत आहेत. 

 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर