गगनबावडा घाटमार्गातील धबधबे झाले प्रवाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:17 IST2021-06-24T04:17:48+5:302021-06-24T04:17:48+5:30

गगनबावडा व परिसरात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरु असून त्यामुळे निसर्गाने भूईबावडा व करुळ घाटातील पर्वतरांगा हिरव्यागार झाल्या आहेत. ...

The waterfalls in Gaganbawda Ghatmarg were flowing | गगनबावडा घाटमार्गातील धबधबे झाले प्रवाहीत

गगनबावडा घाटमार्गातील धबधबे झाले प्रवाहीत

गगनबावडा व परिसरात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरु असून त्यामुळे निसर्गाने भूईबावडा व करुळ घाटातील पर्वतरांगा हिरव्यागार झाल्या आहेत. भूईबावडा तसेच करुळ घाटातील अनेक लहानमोठे धबधबे घाटात कोसळू लागल्याने पर्यटकांचे ते आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरू पाहत आहेत. लाॅकडाऊनमुळे १५ एप्रिल गगनबावडा परिसर पर्यटनाविना सुनासुना आहे. त्यामुळे धबधबे प्रवाहीत होऊनही तेथे निरव शांतता आहे. ते पर्यटकांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. श्रावणात दिसणारे निसर्गाचे विलोभनीय चित्र सध्या दिसू लागल्याने घाटाची मनमोहकता वाढली आहे. सारा परिसर हिरवाईने नटला आहे. दरवर्षी वर्षा पर्यटनाने हे दोन्ही घाट फूलून जातात. मात्र कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाने पर्यटन व्यवसाय यंदा मंदीत आहे. त्यामुळे येथील हाॅटेल व्यवसायही गेल्या गेल्या तीन महिन्यांपासून थंड आहे. काही हाॅटेलमध्ये पार्सल सुविधा सुरु करण्यात आली असली तरी पर्यटकांची तेथेही प्रतीक्षाच आहे.

फोटो =

पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारा भूईबावडा घाटातील धबधबा प्रवाहीत होऊन घाटात कोसळू लागला आहे.

Web Title: The waterfalls in Gaganbawda Ghatmarg were flowing