शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीला पाणी देणार, पण सुळकुड योजना होणार नाही : पालकमंत्री मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 12:34 IST

दूधगंगेसंदर्भात बैठक लावू, शिष्टमंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

कागल : पालकमंत्री या नात्याने इचलकरंजीला पिण्याचे स्वच्छ व मुबलक पाणी पुरवण्याची जबाबदारी मी पार पाडणार आहे. पण, कोणत्याही परिस्थितीत सुळकुड योजना होणार नाही याचीही खबरदारी घेईन, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल दूधगंगा नदी बचाव कृती समितीच्यावतीने सत्कार केला, त्यावेळी ते बोलत होते. ही योजना शासनस्तरावर तत्काळ रद्द करावी, अशी मागणी कृती समितीने केली.दूधगंगा नदीतून इचलकरंजीसपाणी देण्यास दूधगंगा वेदगंगा नदी खोऱ्यात प्रचंड विरोध होत आला आहे. यावर्षीची दुष्काळसदृश परिस्थिती पाहता नदीकाठचा शेतकरी कमालीचा जागृत झाला आहे. या भागातील सर्व राजकीय नेत्यांनीही एकत्र येत या योजनेस विरोध केला आहे. मंत्री मुश्रीफ यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर आता सुळकुड योजना कार्यान्वित होणार अशी काही ठिकाणी चर्चा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी आपली विरोधाची भूमिका कायम आहे, असे सांगितले. इचलकरंजीला इतर ठिकाणाहून मुबलक पाणीपुरवठा करता येतो, तो मी पूर्ण करून देणारच आहे. त्यामुळे सुळकुड पाणी योजना हा विषय आता संपलेला आहे, असे ते म्हणाले. यावेळी कृती समितीचे धनराज घाटगे, विक्रमसिंह माने, युवराज पाटील, अरुण धामाण्णा, अविनाश मगदूम, प्रभू भोजे, उमेश माळी, क्रांतीकुमार पाटील, संदीप दाईंगडे, सुशांत स्वामी, रतन कुंभार उपस्थित होते.

दूधगंगेसंदर्भात बैठक लावू, शिष्टमंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासनइचलकरंजी : दूधगंगा धरणातील पिण्याच्या पाण्याच्या राखीव साठ्यामधून इचलकरंजीस पाणी देण्यासंदर्भात काहींनी शंका उपस्थित केली होती. त्या शंकांचे निरसन करण्यासाठी शासनाने प्रशासनाकडून अहवाल मागविला आहे. त्यानुसार जलसंपदा तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैठक लावण्यासंदर्भात कळविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले.खासदार धैर्यशील माने व दूधगंगा अंमलबजावणी कृती समितीचे निमंत्रक विठ्ठल चोपडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. काही मंडळींनी पिण्याच्या पाण्याच्या साठा उपलब्धतेबाबत शंका उपस्थित केली असल्याने त्यांचे निरसन करण्यासाठी शासनाने प्रशासनाकडून अहवाल मागितला आहे. तो अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. त्यानुसार प्रथम जलसंपदा मंत्री व अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पालकमंत्री व इतर संबंधितांना बोलावून त्यांच्या शंकांचे निरसन करून मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीWaterपाणीHasan Mushrifहसन मुश्रीफ