शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा पाणीपुरवठा सोमवारपासून पूर्ववत सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 13:51 IST

Flood Kolhapur Water : गेल्या आठ दिवसापासून बंद असलेला शिंगणापूर उपसा केंद्राकडील उपसा रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे. या केंद्रात शिरलेले महापुराचे पाणी ओसरल्यामुळे तेथील चार मोटारी बाहेर काढण्यात पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. त्याच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हापूरचा पाणीपुरवठा सोमवारपासून पूर्ववत सुरू होणारशिंगणापूरमधील मोटारी काढल्या बाहेर, दोन दिवसात होणार दुरुस्ती

कोल्हापूर : गेल्या आठ दिवसापासून बंद असलेला शिंगणापूर उपसा केंद्राकडील उपसा रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे. या केंद्रात शिरलेले महापुराचे पाणी ओसरल्यामुळे तेथील चार मोटारी बाहेर काढण्यात पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. त्याच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले.पंचगंगा नदीला महापूर आल्यामुळे गेल्या शुक्रवारपासून शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाची तिन्ही उपसा केंद्रे महापुराच्या पाण्यात बुडाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती.

शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू व्हावा यासाठी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, अधिकारी गेल्या पाच दिवसांपासून प्रयत्न करीत आहेत. बालिंगा उपसा व जलशुध्दीकरण केंद्र सुरू करण्यात त्यांना यश मिळाले. नागदेववाडी जल उपसा केंद्रही शुक्रवारी रात्री सुरू झाले.शुक्रवारी दुपारी शिंगणापूर उपसा केंद्रातील पुराचे पाणी ओसरल्याने चार मोटारी बाहेर काढण्यात आल्या. उर्वरित तीन मोटारी खोलण्याचेही काम रात्रीपर्यंत सुरू होते. चार मोटारी फिटिंगसह दुरुस्ती करण्यास शनिवार व रविवार असे दोन दिवस लागणार आहेत. रविवारी सायंकाळी त्या जोडल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष पाणी उपसा सुरू होईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे पाण्याची प्रतीक्षा संपण्याचा वेळ आली आहे.शहरातील पाण्याचा पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय सुरु आहे. विशेषत: ई वॉर्डातील नागरिकांचे तर प्रचंड हाल होत आहेत. टँकरची प्रतीक्षा करण्यातच नागरिकांचा दिवस जात आहे. अनेक ठिकाणी अजूनही टँकरवर पाणी घेण्यास गर्दी होत आहे. कूपनलिकांवर गर्दी होत आहे.शहराच्या अनेक भागात टँकरद्वारा पाणीपुरवठा केला जात आहे. शुक्रवारी महापालिकेच्या टँकरच्या १५३ फेऱ्या तर खासगी टँकरच्या १४७ फेऱ्यातून ३० लाख लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात आला. टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे एक सूत्र घालून दिले आहे. प्रत्येक प्रभागात दिवसभरात दोन ते तीन टँकर पाणी मिळते. त्यामुळे पाणी टंचाईवर काही प्रमाणात मात करता आली.

टॅग्स :floodपूरwater shortageपाणीकपातkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका