शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारेच्या कारवाईमुळे सील केलेला कृष्णा योजनेचा पाणीपुरवठा सुरू, २२ तास उपसा बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 13:37 IST

इचलकरंजीचे प्रशासन खडबडून जागे 

इचलकरंजी : सांगलीच्या पाटबंधारे विभागाने इचलकरंजी महापालिकेचे मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील पाणी उपसा केंद्र १४ कोटी रुपयांच्या थकबाकीवरून सील केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे तातडीचे पत्र जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पाठविण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी अडीच वाजता सील काढण्यात आले व पाणीपुरवठा सुरू झाला.

शहराला कृष्णा नदीवरील मजरेवाडी उपसा केंद्रातून ४५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. या उपशापोटी १४ कोटी ६० लाख ५९ हजार ८३३ रुपयांची मागणी सांगली पाटबंधारे विभागाने महापालिकेला केली आहे. मात्र, अकरा कोटी इतकीच रक्कम देणे असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यापैकी ७ कोटी २५ लाख रुपये महापालिकेने पाटबंधारे विभागाला भरले आहेत. तसेच १ कोटी ४१ लाख रुपयांची बॅँक गॅरंटीही पाटबंधारेकडे आहे.

असे असताना कोणतीही नोटीस न देता गुरुवारी (दि.२१) सायंकाळी साडेपाच वाजता नृसिंहवाडी विभागाचे शाखाधिकारी आर.सी. दानोळे यांनी मजरेवाडी येथील उपसा केंद्रातील पॅनल बोर्ड, विद्युत संच व मीटरला सील ठोकले. सील तोडल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा येऊन पाहणीही केली.पाटबंधारे खात्याचे उपअभियंता यांनी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची २० मार्चला भेट घेतली होती. महापालिकेची घरफाळा वसुली सुरू असून, शेवटच्या आठवड्यात जास्तीत जास्त रक्कम भरण्यात येईल, असे सांगितले होते. तरीही पाटबंधारे विभागाने धडक कारवाई केल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यापोटी शुक्रवारी २८ लाख ३१ हजार ५५८ रुपयांचा धनादेश पाटबंधारे विभागाला पाठविण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारनंतर पाणीपुरवठा सुरू झाला. तब्बल २२ तास शहराचा पाणीपुरवठा बंद राहिला होता.

महापालिकेने भरली इतकी रक्कम

  • मार्च २०२२ - ७० लाख
  • नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ - १ कोटी
  • १ मार्च २०२३ - चार कोटी २४ लाख ५० हजार
  • मार्च २०२३ - सोळा लाख ४३ हजार ४९७
  • नोव्हेंबर २०२३ - ७५ लाख ४८ हजार व नऊ लाख ९८ हजार.
  • मार्च २०२४ - २८ लाख ३१ हजार ५५८.

कारवाई संयुक्तिक नाही : दिवटे

  • केवळ सुमारे तीन कोटींच्या दरम्यान सेस रक्कम भरणे शिल्लक असून, त्यापोटी शहराचे पाणी थेट बंद करण्याची पाटबंधारे विभागाची कृती संयुक्तिक नाही.
  • पंचगंगा नदीतून पाणी उपसा बंद आहे. सध्या कृष्णा नदीवरूनच पाणीपुरवठा सुरू आहे. पाटबंधारे विभागाने पाणीपुरवठा खंडित केल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद आहे.
  • सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असून, पाणीपुरवठा तत्काळ पूर्ववत न केल्यास नागरिकांकडून उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीWaterपाणी