शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

हमिदवाडकरांना कारखान्यातून पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:10 AM

म्हाकवे : पिण्याच्या पाण्यासाठी हमिदवाडा (ता. कागल) येथील ग्रामस्थांची ऐन उन्हाळ्यातील पाचवीलाच पुजलेली वणवण लवकरच संपणार आहे.गावकऱ्यांनी एकजूट दाखवत लोकवर्गणीतून सदाशिवराव मंडलिक कारखाना कार्यस्थळावरील हौदातून पाणी आणण्याचा निर्धार केला आहे. त्याला प्रा. संजय मंडलिक यांनी प्रतिसाद देत हौदापासून गावच्या टाकीपर्यंत पाईपलाईन खुदाईचे कामही कारखान्याच्यावतीने करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ...

म्हाकवे : पिण्याच्या पाण्यासाठी हमिदवाडा (ता. कागल) येथील ग्रामस्थांची ऐन उन्हाळ्यातील पाचवीलाच पुजलेली वणवण लवकरच संपणार आहे.गावकऱ्यांनी एकजूट दाखवत लोकवर्गणीतून सदाशिवराव मंडलिक कारखाना कार्यस्थळावरील हौदातून पाणी आणण्याचा निर्धार केला आहे. त्याला प्रा. संजय मंडलिक यांनी प्रतिसाद देत हौदापासून गावच्या टाकीपर्यंत पाईपलाईन खुदाईचे कामही कारखान्याच्यावतीने करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हमिदवाडा ग्रामस्थांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.हमिदवाडा गावची पिण्याची पाणी योजना चिकोत्राऐवजी बारमाही वाहणाºया वेदगंगा नदीतून व्हावी, यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ही बाब न्यायप्रविष्ट आहे. चिकोत्रा नदीतून प्रत्येक महिन्यातील १० ते १२ दिवसच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे गावकºयांना अन्य कालावधीत पाण्यासाठी वणवण करावी लागते. यातून सुटका करून घेण्यासाठी लोकवर्गणीतून ही योजना करण्यासाठी ग्रामस्थ सरसावले आहेत. यासाठी सरपंच सुमन विलास जाधव, उपसरपंच शिवाजी मोरबाळे, सदासाखरचे संचालक आनंदा मोरे, माजी सरपंच डी. डी. कोंडेकर यांच्यासह सर्व सदस्य व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.दरम्यान, हमिदवाडकरांसाठी धावून जात प्रा. मंडलिक यांनी कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाच्या संमतीने कारखाना कार्यस्थळावरील हौदापासून ते या गावच्या पाण्याच्या टाकीपर्यंत करण्यात येणाºया पाईपलाईनच्या खुदाईची जबाबदारीही स्वीकारली. तर लोकवर्गणीतून सहा इंची पीव्हीसी पाईपची खरेदी करून ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या कामाला गती मिळाली आहे.लोकवर्गणीतूनच पाईपची खरेदीगावच्या उत्तर बाजूला मंडलिक कारखान्याची पाणी योजना असून कारखान्याच्या वाहनतळावर सिमेंटचा हौद आहे. येथून गावच्या हमिदवाडा गावातील जलकुंभचे सुमारे दोन कि.मी. अंतर आहे. यासाठी जवळपास ३२० इतक्या ६ इंची पीव्हीसी पाईपची गरज आहे. यासाठी सरपंच सुमन जाधव यांनी २१ हजार, उपसरपंच शिवाजी मोरबाळे १५ हजार, डॉ. इनामदार यांनी २० हजार, शशिकांत सुळकु डे यांनी ११ हजार यासह अनेक ग्रामस्थांनी एका पाईपपासून अकरा पाईप देऊ केल्या आहेत.लोकवर्गणीचाच पर्याय....चिकोत्रा ऐवजी वेदगंगा नदीवरूनच हमिदवाडा येथे पिण्याच्या पाण्याची योजना व्हावी यासाठी जनहित याचिका न्यायालयात दाखल आहे. त्यामुळे ही याचिका निकालात निघाल्याशिवाय येथील पाणी योजनेवर कोणताही शासकीय निधी खर्च करता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य घरोघरी जाऊन आपल्या आर्थिक सक्षमतेप्रमाणे लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन करीत आहेत. तर ग्रामस्थही एकसंध होत लोकवर्गणीतून येथील गंभीर पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढे आले आहेत.