शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

Kolhapur: कळंबा तलावातील पाणीसाठ्याने तळ गाठला, ऐतिहासिक शाहूकालीन विहीर उघडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 6:19 PM

ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीला पाणीप्रश्न ऐरणीवर 

अमर पाटीलकळंबा : यंदा प्रथमच मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अर्थात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कळंबा तलावातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. तलाव पात्रातील ऐतिहासिक शाहू कालीन विहीर उडली पडायला सुरुवात झाली आहे. या शाहू कालीन विहिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कळंबा तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी तलावानजीकची बालिंगा व कळंबा गावे तलाव पात्रापासून दूर वसवली. शिवाय संपूर्ण तलाव कोरडा पडला तरी ग्रामस्थांचे आणि मूक जनावरांचे पाण्याविना हाल होऊ नये म्हणून तलाव पात्रात भव्य विहीरीची उभारणी केली होती. आजमितीला कळंबा तलावात निव्वळ आठ फूट पाणीसाठा शिल्लक असून जलचरांच्या अस्तित्वासाठी हा पाणीसाठा पावसाळ्याच्या सुरवातीपर्यंत ठेवणे प्रशासनास क्रमप्राप्तच आहे. पावसाळ्यास अद्यापही अडीच महिन्याचा कालावधी आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगात होत असून डेड वॉटर शिल्लक राहिले तरी पाणीउपसा बंद करण्यात आला नसल्याने २०१६ नंतर पुन्हा यंदा तलाव कोरडा ठणठणीत पडणार हे निश्चित. त्यामुळे कळंबा ग्रामपंचायतीपुढे जैवविविधता कायम राखत पाणीप्रश्नाची भीषणता कमी करण्याचे मोठे आव्हान आहे. प्रशासनाने तलावाचा जीव घोटला गेल्या साठ वर्षात यशवंतग्राम निर्मलग्राम पुरस्कार विजेत्या कळंबा ग्रामपंचायतीला ग्रामस्थांसाठी स्वतःची पाणीपुरवठा योजना उभारता आली नाही. शिवाय पालिका मालिकीच्या तलावाचे पाणी ग्रामपंचायतिला हवे पण सत्तर लाखांची पाणीपट्टी भरण्याच्या प्रश्नी हात वर. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात बिल्डर लॉबीने धुमाकूळ घातला असून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे सुरू झाले आहे. तर पालिका मालकीच्या तलावावर एकही कर्मचारी नियुक्त करण्यात आला नसल्याने तलावाची गटारगंगा होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी