उन्हाळ्यात तहान भागण्याइतपत जिल्ह्यात पाणीसाठा
By Admin | Updated: February 27, 2015 23:24 IST2015-02-27T21:23:35+5:302015-02-27T23:24:52+5:30
पंच्याहत्तर टक्के साठा शिल्लक : गतवर्षीपेक्षा पाच टक्के जादा; पाणी जपून वापरण्याचे ‘पाटबंधारे’चे आवाहन

उन्हाळ्यात तहान भागण्याइतपत जिल्ह्यात पाणीसाठा
प्रकाश पाटील- कोपार्डे -फेब्रुवारी महिना संपता संपताच महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना पाणीटंचाईच्या झळा बसण्याच्या शक्यता शासकीय पातळीवर वर्तविण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्हा मात्र सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण असणार आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांतील व जलाशयातील पाणीसाठा समाधानकारक असून, मागील वर्षी याच कालावधीत असणाऱ्या पाणीसाठ्यापेक्षा तो पाच टक्क्यांनी जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात सध्या जवळपास ७५ टक्के पाणीसाठा आहे.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा हे कोल्हापूर पाटबंधारे विभागांतर्गत येणारे मोठे चार प्रकल्प आहेत. तर कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्री, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा हे आठ मध्यम प्रकल्प आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रकल्पामध्ये ७१ टक्के सरासरी पाणीसाठा आज शिल्लक असून याच दिवशी मागील वर्षी तो ६६ टक्के होता. तर मध्यम प्रकल्पामध्ये तो आजच्या दिवशी ७५ टक्के असून मागील वर्षी याच दिवशी तो ७० टक्के होता. सरासरी पाहता मोठ्या व मध्यम प्रकल्पामध्ये मागील वर्षापेक्षा पाच टक्के पाणीसाठा आजच्या घडीला जादा आहे. पाणीसाठा समाधानकारक असला तरी विशेषत: ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिबक पद्धतीचा वापर करून पाटपद्धतीने पाणी देण्याच्या पद्धतीला फाटा द्यावा व पाणी बचत करावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रकल्प आजचा पाणीसाठाटक्केवारीमागील वर्षी याच टक्केवारी
(द. ल. घ. मीटरमध्ये) दिवशीचा पाणीसाठा
राधानगरी१४५.८७६६ %१७३.८७७९ %
तुळशी६४.४५७० %५७६२ %
वारणा ५९४.७१७६ %५४१६९ %
दूधगंगा४४५.७२६६%३८८.८०५७ %
एकूण१२५०.७५७१ %११६१.०५६६ %