शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

प्रदूषणयुक्त पाणी थेट रंकाळ्यात--बरगे घालण्याचा पालिकेस विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:34 IST

कळंबा : काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने नालेसफाई अभावी ओढ्याखालील, अरुंद नळांसह छोट्या नळांमध्ये पाणी तुंबले.

ठळक मुद्देशाम सोसायटीनजीकचे प्रक्रिया केंद्र दुर्लक्षित

अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने नालेसफाई अभावी ओढ्याखालील, अरुंद नळांसह छोट्या नळांमध्ये पाणी तुंबले. पाण्याचा जोर प्रचंड असल्याने राजलक्ष्मीनगर प्रभागातील शाम हौसिंग सोसायटीनजीकच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या ओढ्यावरील बरगे नगरसेविका दीपा मगदूम यांनी नागरी वस्तीत पाणी शिरू नये यासाठी प्रशासनास काढण्यास भाग पाडले; पण नंतर हे बरगे पूर्ववत घालणे क्रमप्राप्त होते; पण प्रशासनास याचाच विसर पडला आहे.

उपनगरातील साळोखेनगर, तपोवन, राजलक्ष्मीनगर प्रभागांतील ओढ्यांचे पाणी राजलक्ष्मीनगरातील ओढ्यात एकत्र मिळते. पुढे हे पाणी राजलक्ष्मीनगरातील शाम हौसिंग सासोयटीनजीकच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील प्रकल्पातून प्रक्रिया होऊन रंकाळ्यात मिसळते.शाम हौसिंग सोसायटीनजीकच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सिलिंडर सदृश इमारतीतील मोरीत पंपाद्वारे पाणी उपसा केले जाते. यात विविध प्रकारची रासायनिक औषधे मिसळली जातात. तसेच प्रक्रिया केली जाते. यातील जलपर्णी वाढविल्यास प्रदूषण निर्मितीस कारणीभूत असणारे जिवाणू मारले जातात व ते पाणी प्रक्रिया करून पुन्हा रंकाळ्यात सोडले जाते. पंप उपसा बंद पडला की, बंधाºयातील पाण्याची पातळी वाढते. त्यानंतर हे प्रदूषणयुक्त पाणी थेट रंकाळ्यात मिसळते. याठिकाणी दोन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त आहेत; पण बहुतांश वेळा केंद्र बंद, तर कर्मचारी गायब असे आजचे चित्र आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने ओढे तुंबून पावसाचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरून हजारांवर कुटुंबांच्या प्रापंचिक साहित्यांचे नुकसान झाले. वाहने वाहून गेली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.यावेळी या केंद्रावरील बरगे काढण्यात आले खरे; पण महिना उलटला तरी बरगे पूर्ववत बसविण्याचे भान प्रशासनास राहिले नाही. कसेही अस्ताव्यस्त पडलेले बरगे प्रशासन बसविणार कधी? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.प्रत्येक पावसाळ्यात केंद्र पाण्याखालीया प्रकल्पाच्या बंधाºयाची उंची इतकी कमी झाली आहे की, प्रत्येक मुसळधार पावसात हे केंद्र निम्मे पाण्याखाली व पाणी प्रक्रिया न होताच थेट रंकाळ्यात मिसळते. या केंद्राजवळची सफाईही करण्यात आलेली नाही.शाम हौसिंग सोसायटीनजीकच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काढलेले बरगे पूर्ववत बसविण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे.