नृसिंहवाडीत दत्त मंदिराजवळ पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:05+5:302021-06-18T04:18:05+5:30
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात गेल्या २४ तासांत १५ फुटाने वाढ झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा ...

नृसिंहवाडीत दत्त मंदिराजवळ पाणी
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात गेल्या २४ तासांत १५ फुटाने वाढ झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात गेल्या दोन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात गेल्या २४ तासांत १५ फुटाने वाढ झाली. वाढलेले कृष्णा नदीचे पाणी येथील दत्त मंदिरात पोहोचले. नदीचे पाणी वाढण्याचा वेग सायंकाळनंतर जास्त झाल्याने मंदिर परिसरातील साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्यास कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.
१९८४ तसेच २००५ साली याच गतीने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे बुजुर्ग यांनी सांगितले.
हवामान खात्याने सरासरीपेक्षा जास्त पावसाचा दिलेला अंदाज, धरणातून विसर्ग नसताना पहिल्याच पावसात तब्बल १५ फूट वाढलेले पाणी, १९ सालचा महापूर, तसेच कोरोना महामारीची परिस्थिती यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
फोटो - छाया - प्रशांत कोडणीकर कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत १५ फुटाने वाढ झाल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आलेले नदीचे पाणी.