शहराच्या अनेक भागात आजपासून एक दिवसाआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:32+5:302021-06-18T04:17:32+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका शहर पाणीपुरवठा विभागावर शहरातील बहुतांशी भागात आज, शुक्रवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली आहे. ऐन ...

शहराच्या अनेक भागात आजपासून एक दिवसाआड पाणी
कोल्हापूर : महानगरपालिका शहर पाणीपुरवठा विभागावर शहरातील बहुतांशी भागात आज, शुक्रवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली आहे. ऐन पावसाळ्यात ही परिस्थिती उद्भवल्याने शहरवासीयांना तांत्रिक पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पंप नादुरुस्त होण्याची पंधरा दिवसातील ही तिसरी घटना आहे.
शिंगणापूर उपसा केंद्राकडून पुईखडी जलशुध्दीकरण केंद्राकडे अशुध्द पाणीपुरवठा करणाऱ्या चारपैकी दोन पंप बंद पडले असून त्यापैकी एक पंप तातडीने दुरुस्त करण्यात येत आहे. तथापी सर्व चारही पंप सुरू होण्यास आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शहरातील ए, बी व ई वॉर्ड त्यास सलग्नित उपनगरे, ग्रामीण भागातील नळ कनेक्शनधारकांना खालील भागातील नळ कनेक्शनधारकांना आज, शुक्रवारपासून एक दिवसांआड पाणीपुरवठा करणेचे नियोजन करण्यात आले आहे.
नियोजनाप्रमाणे ई वॉर्ड त्यास सलग्नित उपनगरे व ग्रामीण भागास आज, शुक्रवारपासून तर ए, बी वॉर्ड व त्यास सलग्नित उपनगरे व ग्रामीण भागास उद्या शनिवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
-एक दिवसाआड पाणीपुरवठा होणारा भाग -
१. ए, बी, वॉर्ड -
पाण्याचा खजिना वितरण शाखा, मंगळवारपेठ, शिवाजीपेठ, मंगेशकर नगर, मिरजकर तिकटी, भारत डेअरी परिसर, संभाजीनगर, मंडलिक वसाहत, तिकोणे गॅरेज, कीर्ती हौसिंग सोसायटी , कोळेकर तिकटी, पोतनीस बोळ, शाहू बँक परिसर, कोष्टी गल्ली, प्रॅक्टिस क्लब, वारे वसाहत, साळोखेनगर, बापुराम नगर, महाराष्ट्रनगर, सुर्वेनगर, प्रथमेश नगर, शिवगंगा कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, वाल्मीकी आंबेडकरनगर, राधे कॉलनी, शांती उद्यान, इंगवले मळा, आई कॉलनी, कात्यायणी कॉम्प्लेक्स, राजीव गांधी परिसर, जरगनगर, गंजीमाळ, रामानंदनगर, नाळे कॉलनी, विजयनगर, जुनी मोरे कॉलनी, नवी मोरे कॉलनी, वर्षानगर, भारतनगर, सुभाषनगर पंपिंगवरील ग्रामीण भाग, पाचगाव, आर.के. नगर, पुईखडी, जिवबानाना पार्क, विशालनगर, आयसोलिएशन, वाय.पी. पोवार नगर, वर्षा विश्वास, शिवस्वरूप कॉलनी, पोस्टल कॉलनी, आर.के. नगर परिसर, जरगनगर ले आऊट.
२. ई वॉर्ड राजारामपुरी -
संपूर्ण राजारामपुरी परिसर, शाहू मिल, वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीनपार्क, शांतीनिकेतन, रेव्हेन्यू कॉलनी, अरुणोदय, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कूल , सम्राट नगर, प्रतिकानगर, इंगळेनगर, दौलतनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, नवश्या मारुती चौक, दत्तगल्ली, यादवनगर, कामगार चाळ, पंत मंदिर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनीनगर, जागृतीनगर, पायमल वसाहत, अंबाई डिफेन्स, राजाराम रायफल, काटकरमाळ.
शहरातील नागरिकांना दैनंदिन पिण्याचे पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकरव्दारे पिण्याचे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. नळ कनेक्शनधारकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
‘शिंगणापूर’ केंद्रात तिसरा प्रकार-
शिंगणापूर उपसा केंद्रात गेल्या पंधरा दिवसात उपसा पंप नादुरुस्त हाेण्याचा हा तिसरा प्रकार आहे. याआधी दोन वेळा याच उपसा केंद्रातील पंप बंद पडल्याने कसबा बावडा जलशुध्दीकरण केंद्राकडे नेण्यात येणारे अशुध्द पाणी नेण्यात अडचणी आल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण ई वॉर्डचा पाणीपुरवठा दोनवेळा विस्कळीत झाला होता. आता तर शिंगणापूर योजनेतील चारपैकी दोन पंप बंद पडले आहेत.