शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

Kolhapur: कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:31 IST

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिण द्वार सोहळा आज, बुधवारी (दि.२५) दुपारी एक ...

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिण द्वार सोहळा आज, बुधवारी (दि.२५) दुपारी एक वाजता संपन्न झाला. दुपारची वेळ व ज्येष्ठ अमावस्या यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. उसंत घेतलेल्या पावसाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आणि आज दुपारी एक वाजता चालू सालातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला. भाविकांनी दिगंबरा दिगंबराच्या व श्री गुरुदेव दत्त च्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला. भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान मार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. दरम्यान श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी प. प. श्री नारायण स्वामी यांचे मंदिरात ठेवण्यात आली आहे. नृसिंहवाडी व औरवाड यांना जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे.दक्षिणद्वार सोहळा योगायोगचश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर बाजूने येणारा कृष्णा नदीचा प्रवाह येथील दत्त चरणांना स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडतो या सोहळ्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात. श्री चरणावरून येण्याऱ्या कृष्णा प्रवाहात स्नान केल्याने पापांचा ह्रास होऊन पुण्याची प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक स्नान व दर्शनासाठी गर्दी करतात.