शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील कळंबा तलावाची पाणीपातळी घटली, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे सावट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 14:05 IST

अमर पाटील   कळंबा : कळंबा, पाचगावसह उपनगरांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्राेत असणाऱ्या कळंबा तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ ...

अमर पाटील  कळंबा : कळंबा, पाचगावसह उपनगरांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्राेत असणाऱ्या कळंबा तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाणीपातळी पंधरा फुटांवर गेल्याने यंदा ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न पेटणार हे निश्चित. फेब्रुवारीत दैनंदिन तापमानात वाढ झाल्याने बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढला असल्याने तलाव पात्रातील शाहूकालीन विहीर उघडी पडायला सुरुवात झाली आहे.

आजमितीला तलावातून कळंबा ग्रामपंचायत दररोज एक, तर पालिका आठ एमएलडी पाणी उपसा करते़ तलावातील जलचरांच्या अस्तित्वासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत किमान दहा फूट मृत पाणीसाठा अर्थात डेड वॉटर शिल्लक ठेवावेच लागते. याचा अर्थ फक्त पाच फूट पाणीसाठ्याचाच उपसा प्रशासनास करावा लागणार. ऐन उन्हाळ्यात पुढील तीन महिने नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्याचे संबंधित प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. वाढत्या उन्हाच्या तडाख्याने तलावातील पाण्याचा वापर अंघोळ, जनावरे, गाड्या, कपडे धुण्यासाठी होत असल्याने पाण्याचा उग्र वास येत आहे़

प्रशासनाने घोटला शाहूकालीन तलावाचा गळापालिका मालकीच्या तलावातील पाणीउपसा करणाऱ्या कळंबा ग्रामपंचायत प्रशासनाने पालिकेची सत्तर लाखांची पाणीपट्टी कित्येक वर्षे भरली नाही, तरी पालिका प्रशासन मूग गिळून गप्प का. तलावाच्या वीस एकर हद्दीत अतिक्रमण करून रासायनिक शेती केली जात आहे. त्याचा तलावातील पाण्यावर विपरीत परिणाम होत आहे. तरीही प्रशासन सुस्त आहे. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात बेकायदेशीर बांधकामे व व्यवसाय सुरू असून, कारवाई होत नाही. सात कोटींच्या सुशोभीकरणाचे संवर्धन ग्रामपंचायतीला करता आले नाही. पालिकेचा एकही कर्मचारी तलावावर देखभाल करण्यासाठी नियुक्त केला नाही, हे दुर्दैव.

थेट पाइपलाइन कार्यान्वित झाल्याने तलावातून पाणीउपसा कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून, पुईखडीमधून पाणीउपसा करून पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. -दिलीप तेलवी, ग्रामविकास अधिकारी, कळंबा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी